चिकन | Chicken | tasty chicken | indian chicken recipe | best chicken marinade | easy chicken | indian cooking | indian cuisine

पेपरकॉर्न चिकन | डॉ. मनीषा तालीम | Peppercorn Chicken | Dr. Manisha Talim

पेपरकॉर्न चिकन

साहित्य: १/२ किलो चिकन (शाकाहारींसाठी पनीर/मशरूम, जे शिजायला निम्मा वेळ लागतो), ४ मोठे चमचे दही (आंबट नसावे), २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ छोटा चमचा मिरपूड (चिकनच्या तुकड्यांना काट्या-चमच्याने छिद्र करा. वर दिलेले साहित्य एकत्र करून त्यात चिकन घोळवून तासभर ठेवा), २ कांदे, ३ लसणाच्या पाकळ्या, १ इंच आले, १० अख्खी मिरी, १ मोठा चमचा तेल, १/२ छोटा चमचा मीठ.

कृती: तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्या. आता त्यात चेचलेले लसूण, आले आणि मिरी घाला. त्यानंतर मॅरिनेट केलेले चिकन घाला आणि मध्यम आचेवर शिजवा. शिजवताना मधून मधून हलवत राहा. याला साधारण २० मिनिटे लागतील. पेपरकॉर्न चिकन आता तयार आहे.

महत्त्व: शरीरासाठी प्रथिने महत्त्वाची असतात. ऊतींची जडणघडण, रोगप्रतिकारकशक्ती, संप्रेरकांची व एन्झाइम्सची निर्मिती यासाठी शरीराला प्रथिनांची आवश्यकता असते. मांसाहारींना अंडी, चिकन किंवा डुकराच्या मांसांतून प्रथिने मिळतात. या चिकन पाककृतीमध्ये काळीमिरी आहे. यात अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. आपल्या पेशींना झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्याची मदत होते. मधुमेहामध्ये स्वयंपकाची पद्धतही महत्त्वाची असते. तळण्याऐवजी मांस/मासे उकडून किंवा कालवणात घालून खाणे हितकारक असते. शाकाहारी व्यक्ती चिकनऐवजी मशरूमचा वापर करू शकतात.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. मनीषा तालीम

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.