‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी - लघु लघुकथा स्पर्धा’
स्पर्धेचे नियम आणि अटी :
१. या स्पर्धेकरिता लेखकांनी आपली ३०० शब्दांपर्यंतची अप्रकाशित लघुकथा पाठवावी.
२. आपण आपली लघुकथा ‘कालनिर्णय’च्या कार्यालयात १५ जून २०२४ पर्यंत पोस्ट, कुरिअर किंवा ई-मेलने kathaspardha@kalnirnay.com वर पाठवावी. तसेच सोबत आपला पासपोर्ट साईज फोटो देखील पाठवावा.
३. कथा स्वतःचीच असावी, अनुवादित किंवा इतर लेखकांच्या कल्पनांची ‘कॉपी’ केलेली नसावी. तसे असल्याचे पुढे आढळून आले आणि संबंधित लेखकाने कायदेशीर कारवाई केली तर त्याची जबाबदारी स्पर्धकाकडे असेल. त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, आयोजक जबाबदारी घेणार नाहीत.
५. स्पर्धेसाठी पाठवण्यात येणारी कथा याआधी कुठेही (छापील-दृश्य माध्यमांत अथवा सोशल मीडियावर) प्रकाशित झालेली नसावी.
६. प्रत्येक स्पर्धकाची एकच कथा स्वीकारण्यात येईल.
७. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची, तसेच विषयाची अट नाही.
८. कथा पाठवण्याची अंतिम तारीख १५ जून २०२४ आहे.
९. तुम्ही पाठवलेल्या कथांमधून सर्वोत्कृष्ट कथांची निवड ‘कालनिर्णय’तर्फे करण्यात येईल.
१०. स्पर्धेविषयी परीक्षक व ‘कालनिर्णय’ संपादन विभाग यांचा निर्णय अंतिम असेल. छापून न आलेले साहित्य परत पाठविले जाणार नाही, याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
११. कथा पाठविण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे :
‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२४ – लघु लघुकथा स्पर्धा’
सुमंगल प्रेस प्रा. लि.,
१७२, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय इमारत,
एम.एम.जी.एस. मार्ग, शारदा सिनेमाच्या शेजारी,
दादर (पू.), मुंबई : ४०० ०१४
फोन : ०२२-२४१३ ५०५१ / ३१०३ ०८२६