स्मार्टफोन | Digital | digital detox | digital detoxification | phone detox | detoxing digitally meaning | digital detox day 2024

स्मार्टफोनच्या व्यसनापासून मुक्तीचा मार्ग | रोहित चंदावरकर | Ways to get rid of smartphone addiction | Rohan Chandavarkar

स्मार्टफोन च्या व्यसनापासून मुक्तीचा मार्ग

शहरातील व्यक्ती दर १५ मिनिटांच्या अंतराने फोनमध्ये पाहिले नाही तर अस्वस्थ होतात, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.याचाच अर्थ, अत्यंत सहजपणे आपण सर्वच जण स्क्रीन अॅडिक्शनचे शिकार होत आहोत.

आपल्या मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा व्यावसायिक संपर्कासाठी असेल, पंधरा वर्षांपूर्वी देशातील शहरी पांढरपेशा समाजात सुरू झालेली ही संपर्कयात्रा आता देशातील माहिती प्रसाराचे आणि जनसंपर्काचे सर्वात मोठे माध्यम बनली आहे.

देशातील लहान मुले तरुणांपासून मध्यमवयीन ते वृद्ध अशा सर्वच वयोगटातील जनतेचे फेसबुक, टि्वटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम हे अविभाज्य अंग झाले आहे. आज अनेक लोक वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल्स यापेक्षा समाज माध्यमांवर अधिक वेळ घालवत असतात. ही समाज माध्यमे आणि डिजिटल जग हेच सध्याच्या घडीला संपर्काचे अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक माध्यम बनलेले आहे. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात हीच स्थिती आहे.

एक गोष्ट मात्र खरी, की कालातीत अशा डिजिटल तंत्रज्ञानाचे सकारात्मक परिणाम आहेत, तसेच नकारात्मक परिणामही आहेत आणि हे परिणाम समाजावर दीर्घकालीन प्रभाव टाकणारे आहेत.

डिजिटल उपकरणांचा दुष्परिणाम :

डिजिटल उपकरणांचा अती वापर केल्यामुळे झोप कमी होणे, डोळे दुखणे, धुरकट दिसणे, डोकेदुखी, नैराश्य यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.कुणाशी संवाद सुरू असताना मोबाइलचा वापर करणे, हे समोरच्या व्यक्तीला अपमानित करण्यासारखे असते.

अतिरिक्त प्रमाणावर असा वापर करणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांना अत्यल्प झोप लागणे असे प्रकार प्रामुख्याने दिसून आले आहेत. झोपताना वापरलेल्या या उपकरणांमुळे (devices)  अनेकदा त्या व्यक्तीचा मूड बिघडतो, चिडचिड होत असल्याचे संशोधनाअंती दिसून आले आहे.सर्वेक्षण केलेल्या लोकांपैकी ७० टक्के लोक त्यांचे समाज माध्यमांवरील अपडेट्स किंवा त्यात स्वतःचा सहभाग झोपण्यापूर्वी अंथरुणात पहुडले असताना पाहत असतात, तर १५ टक्के लोक त्यांचा एक तासापेक्षा जास्त वेळ झोपण्यापूर्वी अंथरुणात असताना मोबाइलवर घालवतात. रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणात असताना केलेला मोबाइलचा वापर निद्रानाश, नैराश्य यांसारख्या आजारांना निमंत्रण देणारा ठरू शकतो, हे या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. या अतिरेकी वापरापासून स्वतःला दूर ठेवण्याचे महत्त्व आता अनेकांच्या लक्षात येऊ लागले आहे. यातूनच सध्या डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना समोर येऊ लागली आहे.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?

माहिती आणि सततच्या मेसेजेसमुळे विचारांचा गोंधळ निर्माण होऊन मनावर ताण येतो. मोबाइलच्या आहारी गेल्यामुळे डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना पुढे आली. काय आहे हा प्रकार? काही ठरावीक काळानंतर मनुष्य त्याच त्याच गोष्टी करण्यापासून परावृत्त होतो. स्मार्टफोन, दूरचित्रवाणी संच, टॅब्लेटस ही डिजिटल उपकरणे वापरण्याचा आणि त्याद्वारे समाज माध्यमांवर प्रकट होण्याचा त्याला कंटाळा येऊ शकतो किंवा येतो. डिजिटल उपकरणांपासून फारकत (detoxing from digital devises) घेत व्यक्ती आपल्या वास्तव जीवनाकडे लक्ष केंद्रित करते आणि खऱ्या जीवनात कोणत्याही अडथळ्याशिवाय सामाजिक गोष्टींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. हे करत असताना काही काळ तरी माणूस या व्यापातून मोकळा होतो आणि सतत कोणाशी तरी जोडले राहण्याचा एक अनामिक ताण कमी होतो. थोडक्यात काय, तर एका काल्पनिक व आभासी जगातून प्रत्यक्ष बाहेर पडून वास्तविक जगात जगायचे!

डिजिटल डिटॉक्सचे कारण:

मोबाइल व सोशल मीडियाचा अती वापर हे व्यसन बनत असून त्यामुळे इतर काही काम करण्याची क्षमता कमी होत जाते. सोशल मीडियावर आपण एखादी पोस्ट टाकली आणि त्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे लाईक किंवा कमेंट्स मिळाल्या नाही, तर काही जण अस्वस्थ व बेचैन होतात.

या काल्पनिक जगाशी आपण इतके जोडले जातो, की या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत हेच अनेकदा विसरतो. यामुळे आपला वास्तव जगाशी संपर्क खूप कमी होतो. हे टाळण्यासाठी डिजिटल डिटॉक्सिफिकेशन या संकल्पनेची अत्यंत आवश्यकता भासू लागली आहे.

डिजिटल डिटॉक्सची गरज:

डिजिटल साधनांचा अतिरेकी वापर पाहता, दर काही महिन्यांच्या अंतराने डिजिटल डिटॉक्स आता गरजेचा झाला आहे. तुम्हाला डिजिटल डिटॉक्सची गरज आहे, हे कसे ओळखायचे असा प्रश्न पडला असेल तर, पुढील प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करा :

२० मिनिटांपेक्षा अधिक वेळ तुम्ही तुमचा फोन तपासला नसेल आणि तुम्हाला चुकल्यासारखे किंवा अस्वस्थ वाटत असेल किंवा तुमचा फोन सोबत नसताना तुम्हाला निराश किंवा डिप्रेस्ड् झाल्यासारखे वाटत असेल किंवा काहीतरी आपल्याकडून सुटून चालले आहे आणि फोन पाहिला नाही, तर आपण माहितीच्या जगात मागे पडू असे वाटत असेल तर डिजिटल डिटॉक्स गरजेचा आहे.

डिजिटल डिटॉक्स कसे करावे?

डिजिटल साधनांपासून स्वतःला दूर ठेवणे किंवा त्यापासून फारकत घेणे हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत हितकारक आहे. मात्र याचा अर्थ असा नव्हे, की फोन किंवा अन्य डिजिटल साधनांपासून पूर्णतः फारकत घेणे. संपूर्णपणे या उपकरणांचा वापर बंद करण्याऐवजी ही साधने वापरण्याबाबत काही सीमारेषा आखून घेणे गरजेचे आहे. अँड्रॉइड फोनवर स्ह्लड्ड४ स्नह्म्द्गद्ग हे अॅप आहे, ज्यावर तुम्ही फोनमधील कोणकोणत्या अॅप्सवर किती वेळ घालवला याचा हिशोब मिळतो. जेणेकरून त्याचा आढावा घेऊन फोनवर आपण किती वेळ घालवायचा हे तुम्हाला ठरवता येईल. या साधनांचा वापर आपल्या वैयक्तिक नुकसानापेक्षा फायद्याचा कसा ठरेल, हे पाहणे सोयीचे आहे. आपल्या शारीरिक आणि भावनिक स्वास्थ्याला कुठे तडा जाणार नाही, ही काळजी या साधनांपासून अंतर राखताना घ्यायला हवी. यासाठी सर्वात आधी मेसेज नोटिफिकेशन टोन बंद करा. दुसरे म्हणजे हळूहळू स्क्रीन टाइम कमी करत न्या. शक्य तेव्हा ऑडिओ अॅप्स वापरा. उदा. बातम्या ऐकण्यासाठी Listen News, Newsly : News Voice Feed Reader तर गाणी ऐकण्यासाठी Spotify, Wynk, पुस्तके वाचण्यासाठी Audible Audiobooks & Podcasts, Headfone, Pratilipi  यांसारखे अॅप्स वापरता येतील.

या डिजिटल साधनांपासून काही ठरावीक काळासाठी पूर्णतः अंतर तुम्ही ठेवू शकलात, तर उत्तम! परंतु हे करताना आपल्याला नक्की हेच करायचे आहे, याचे भान असू दे. कारण अनेकांना तसे करण्याने पूर्णतः मोकळे झाल्यासारखी थोडक्यात स्वातंत्र्याची किंवा ताजेतवाने झाल्याची अनुभूती मिळू शकते.

त्यामुळे या डिजिटल उपकरणांपासून काही काळासाठी फारकत घ्या. काही काळ ठरवून तुम्ही हे करू शकता. कदाचित ही कालमर्यादा तीन दिवसांपासून सुरू करून पाच दिवस किंवा सात दिवस अशी वाढवता येईल. या वेळात मोकळ्या आणि शुद्ध हवेत श्वास घ्या, निसर्गाची अनुभूती घ्या.पुस्तके किंवा अन्य साहित्याचे वाचन करा. आपल्या एखाद्या आवडत्या छंदासाठी वेळ द्या. ज्या गोष्टी इतर वेळी करता येत नाही, त्या गोष्टी आता करून घ्या. डिटॉक्सचा अर्थ असा नाही, की तुम्ही तुमचा मोबाइल फोन किंवा लॅपटॉप पाहायचाच नाही. डिटॉक्सच्या काळात एखाद-दुसऱ्या वेळेला फोन पाहू शकता. सकाळी आणि संध्याकाळी महत्त्वाचे मेसेज पाहायला हरकत नाही.

डिजिटल डिटॉक्सचे फायदे:

  • स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी वेळ मिळतो.
  • मनोरंजनासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे संपते.
  • चिडचिड कमी होते.

हा डिटॉक्स कालावधी संपल्यानंतर तुम्हाला पुनरुज्जीवित झाल्यासारखे आणि एकदम निश्चिंत झाल्यासारखे वाटेल, तर मग वेळ कशाला लावता,शुभस्य शीघ्रम!

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


रोहित चंदावरकर

(लेखक ज्येष्ठ टीव्ही व वृत्तपत्र पत्रकार आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.