September 18, 2024
कोकम | kokum syrup recipe | kokum syrup with sugar | kokum dishes | indian cooking | indian cuisine

क्रिमी कोकम | जया खेर, इंदौर | Creamy Kokum | Jaya Kher, Indore

क्रिमी कोकम

साहित्य: ४ कप दूध, १ कप नारळाचे दूध, १ कप दुधाची साय, १ कप साखर, २ छोटे चमचे कॉर्नक्रलोअर, २० कोकणी आमसुले.

 कृती: सर्व आमसुले दोन वाटी पाण्यात चार तास भिजवा. नंतर मिञ्चसरमध्ये एक कप साखर आणि आमसुले (पाण्यासकट) बारीक वाटून घ्या. ही पेस्ट एका पातेल्यात घेऊन गॅसवर ठेवा आणि सतत ढवळत राहा.जरुरीपुरते पाणी घाला आणि छान मुरंबा तयार करा. आता चार कप दूध आटवून अर्धे करा. कॉर्नक्रलोअर थंड दुधात घोळवा व ते या आटलेल्या दुधात घाला. सतत हलवत राहा, छान दाटसर दूध तयार होईल. हे थंड होऊ  द्या. मिञ्चसर द्ब्रलेंडरमध्ये दुधाची साय, नारळाचे दूध व आटलेले दूध घेऊन द्ब्रलेंड करा. आता यात कोकमाचा मुरंबा घाला.

सजावटीसाठी थोडा मुरंबा बाजूला काढून ठेवा. मिश्रण व्यवस्थित द्ब्रलेंड करा आणि एका हवाबंद डद्ब्रयात काढा. डबा बंद करून प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवा. सजावटीसाठी तुक्वही या आइस्क्रीमवर कोकमाचा मुरंबा घालू शकता.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


जया खेर, इंदौर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.