गव्हाचा कुरकुरीत डोसा | गिरीजा नाईक | Crispy Wheat Dosa | Girija Naik

Published by गिरीजा नाईक on   July 1, 2022 in   RecipesTiffin Box

गव्हाचा कुरकुरीत डोसा

साहित्य: १ कप गव्हाचे पीठ, १/२ कप तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा काळी मिरी, १ छोटा चमचा जिरे, १ बारीक चिरलेला कांदा, ३ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल व आवश्यकतेनुसार पाणी.

कृती: एका भांड्यात गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, काळी मिरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व पाणी घालून पातळसर मिश्रण तयार करा. त्यानंतर नॉन स्टिक तवा तापवून घ्या. त्यावर हे मिश्रण पसरवून घ्या. तेल शिंपडून तीन-चार मिनिटे शिजू द्या. खालची बाजू लालसर झाल्यानंतर परतवून घ्या. दोन मिनिटे पुन्हा शिजू द्या. गव्हाचा कुरकुरीत डोसा तयार. खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


गिरीजा नाईक