बीटाचे कटलेट | गिरीजा नाईक | Beetroot Cutlet | Girija Naik

Published by गिरीजा नाईक on   August 1, 2022 in   Tiffin Box

बीटाचे कटलेट

साहित्य: ३ बीट (२ उकडलेले व १ कच्चे), २ उकडलेले बटाटे, २ किसलेले गाजर, १/४ कप शिजवून स्मॅश केलेले मटार, १ बारीक चिरलेला कांदा, २ मोठे चमचे बेसन, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, १ छोटा चमचा मिरची पावडर, १ छोटा चमचा धणे पावडर, १/२ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा आमचूर पावडर, १/२ छोटा चमचा जिरेपूड, १/२ छोटा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, १/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ मोठे चमचे बारीक रवा, ३-४ मोठे चमचे तेल.

कृती: सर्वप्रथम एका भांड्यात दोन उकडलेले बीट व बटा=टे किसून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, किसलेले गाजर, स्मॅश केलेले मटार व कच्चे किसलेले बीट घाला. नंतर एका छोट्या कढईत बेसन लालसर होईस्तोवर भाजून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये आले लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धणे पावडर, जिरेपूड, आमचूर पावडर, चाट मसाला, भाजलेले बेसन व चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करा. मिश्रणाचे समान आकाराचे गोळे बनवा. तळव्यांना तेल लावून कटलेट ला तुमच्या आवडीचा आकार द्या. कटलेट्सला दोन्ही बाजूंनी रवा लावा. कढई / तवा गरम करून एक चमचा तेल घालून दोन्ही बाजूंनी  लालसर होईस्तोवर कटलेट्स भाजा. आवश्यकता असल्यास कटलेट्सच्या बाजूने थोडे तेल सोडा. कटलेट्स कुरकुरीत झाल्यानंतर कांदा, टोमॅटो केचअप किंवा सलाडसोबत सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


गिरीजा नाईक