केनाची भजी | संगीता बडगुजर | रानभाज्या

Published by Kalnirnay on   August 4, 2021 in   रानभाज्या

केनाची भजी

मराठी नाव : केना

इंग्रजी नाव : Benghal Dayflower

शास्त्रीय नाव : Commelina Benghalensis

आढळ : ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेलाही आढळून येते.

कालावधी : जून ते सप्टेंबर

वर्णन : केना हे जमिनीवर वेगाने पसरत जाणारे तण आहे. याच्या नाजूक खोडाच्या पेराला मुळे फुटतात. या वनस्पतीची पाने साधी, लंबगोलाकार, टोकदार आणि थोडी जाडसर असतात. केनाच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. केनाला छोटी तीन पाकळ्यांची निळसर जांभळी फुले येतात.

साहित्य : २० ते २५ केनाची पाने, २ मोठे चमचे बेसन, १ मोठा चमचा तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा हळद, तिखट, धणे पावडर, चवीनुसार मीठ, आवडीनुसार ओवा, तळण्यासाठी तेल.

कृती : केनाची पाने धुऊन निथळत ठेवावीत. उर्वरित साहित्य एकत्र करून भजीचे पीठ भिजवून घ्यावे. कढईत तेल कडकडीत तापवून केनाची पाने भजीच्या पिठात बुडवून तळावीत. खमंग, कुरकुरीत भजी तयार.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– संगीता बडगुजर