मॅंगो डिलाईट | अलका फडणीस

Published by अलका फडणीस on   May 9, 2019 in   2017Food Corner

 

मॅंगो डिलाईट बनवण्यासाठी 


  • साहित्य:
  1.  १२ हापूस आंबे
  2. १ डबा अमूल फ्रेश क्रीम
  3. १/२ डबा कन्डेन्स्ड मिल्क

दहा हापूस आब्यांच्या रस काढावा, दोन आंब्याचे बारीक तुकडे, फोडी कराव्या. आंब्याचा रसात क्रीम व कन्डेन्स्ड मिल्क नीट मिक्स करावे. त्यात आंब्यांचे तुकडे (फोडी) घालावे व थंड करावे. छान पारदर्शक बाऊलमधून थंड सर्व्ह करावे.

  • टीप:

आंब्याऐवजी मॅंगो पल्प वापरला तरी चालेल. परंतु मॅंगो पल्प वापरायचा असल्यास कन्डेन्स्ड मिल्क वापरू नका. कारण मॅंगो पल्प मध्ये साखर असते.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अलका फडणीस