पंचरत्न लाडू | सई शिंदे, पुणे | Pancharatna Laddu | Sai Shinde, Pune

Published by सई शिंदे, पुणे on   September 8, 2021 in   Food Corner

पंचरत्न लाडू

साहित्य : १/४ कप सूर्यफुलाच्या बिया, १/४ कप भोपळ्याच्या बिया, १/४ कप जवस बिया, १/४ कप तीळ, १/४ कप ओट्स, १ कप बी नसलेले ओले खजूर, २-३ चमचे पाणी किंवा दूध, १ चमचा वेलची पूड.

सजावटीसाठी : १ चमचा खसखस, सुकवलेल्या जर्दाळूचे काप, २ चमचे चीया सीड्स.

कृती : सूर्यफूल, जवस, भोपळा बिया, तीळ व ओट्स सर्व वेगवेगळे दोन मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. एकत्र करून थंड करा. थंड झाल्यानंतर मिक्सरवर बारीक पावडर करून घ्या. कढईत दोन-तीन चमचे पाणी किंवा दूध घेऊन त्यात एक कप बी नसलेले ओले खजूर दहा ते बारा मिनिटे मंद आचेवर शिजवा. शिजवताना मिश्रण एकजीव करत सतत हलवत राहा. बारा मिनिटांनंतर बियांची पावडर या मिश्रणात मिक्स करून घ्या. गॅस बंद करून त्यात वेलची पूड घाला. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावून चीया सीड्स, खसखस व सुकविलेल्या जर्दाळूचे काप पसरून लाडू वळा. पंचरत्न लाडू तयार.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– सई शिंदे, पुणे