तलबीना – खुर्शिदबानू शामलिक

Published by खुर्शिदबानू शामलिक on   May 25, 2019 in   2019Food Corner

तलबीना बनविण्यासाठी लागणारे-

  • साहित्य:
  1. १०० ग्रॅम बार्ली
  2. १ लिटर दूध
  3. ८ खजूर
  4. १ टेबलस्पून मध
  5. १ टीस्पून वेलदोडे पावडर
  6. ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे (बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू)

बार्ली चार तास पाण्यात भिजत घाला. त्यानंतर मिक्सरमधून या बार्लीची भरड काढून घ्या म्हणजे ती लवकर शिजेल. दूध तापवत ठेवा. दुधाला उकळी आल्यावर त्यात बार्लीची भरड घाला आणि शिजायला ठेवा. हे मिश्रण चमच्याने सारखे ढवळत राहावे म्हणजे खाली लागणार नाही. बार्ली शिजल्यावर त्यात खजूर कुस्करून टाका. नंतर त्यात वेलची पावडर घाला. वरून ड्रायफ्रूट्स आणि मध घाला. आवडीप्रमाणे हे प्रमाण कमीअधिक करता येईल. खजूर, मधामुळे गोडवा येतो. गोड चवीसाठी बाकी काहीही घालू नये. मिश्रण शिजल्यावर गॅस बंद करावा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


खुर्शिदबानू शामलिक