उपवासाच्या रताळ्याचे गुलाबजाम | तृप्ती राऊत, पुणे | Fasting Sweet Potato Gulab Jamun | Trupti Raut, Pune

Published by तृप्ती राऊत, पुणे on   August 2, 2021 in   2021Dessert Special

उपवासाच्या रताळ्याचे गुलाबजाम

साहित्य : १/४ किलो रताळी, ७५ ग्रॅम मिल्क पावडर, तळण्यासाठी तेल/तूप, १/४ किलो साखर, ११/२ कप पाणी, वेलची पूड.

कृती : रताळी उकडून स्मॅश करून घ्या.मग त्यात मिल्क पावडर घालून मिश्रण चांगले एकजीव करा. तयार मिश्रणाचे गोळे बनवून मध्यम आचेवर तळा. पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी आणि साखर एकत्र करून एकतारी पाक तयार करा व त्यात वेलची पूड घाला.तळलेले गुलाबजाम पाकात घाला आणि गुलाबजाम मुरल्यानंतर ड्रायफ्रूट्सने सजवा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


तृप्ती राऊत, पुणे