मल्टी ग्रेन चपाती | कमल गवळी | Multi Grain Chapati | Home Made Recipe

Published by कमल गवळी on   March 11, 2020 in   2020Paknirnay Recipe

मल्टी ग्रेन चपाती

साहित्य : २५० ग्रॅम जवस, १०० गॅ्रम तीळ, २५० ग्रॅम गव्हाचे पीठ, १५० ग्रॅम ओट्स, थोडी शेवग्याची भाजी व शेंगा, थोडी मेथीची भाजी, तूप, खसखस, तुळशीच्या बिया.

कृती : गॅसवर लोखंडी कढई ठेवून मंद आचेवर जवस तसेच तीळ व ओट्स भाजून घ्या व नंतर मिक्सरमध्ये  वाटून घ्या. नंतर कढईत थोडे तूप घालून शेवग्याची पाने व मेथी भाजी परतून घ्या. परातीमध्ये जवस, ओट्स, तीळ यांचे पीठ, गव्हाचे पीठ, भाजी, शेंगांचा गर, मीठ, तूप घालून मळून घ्या. दहा मिनिटे झाकून ठेवा. नंतर चपाती लाटताना वरून तीळ, खसखस, तुळशी बिया लावा. ओट्स व भाजी असल्यामुळे चपातीच्या कडा तुटतात म्हणून लाटलेल्या चपातीला गोल डब्याच्या झाकणाने कट करून पॅनवर तुपावर दोन्ही बाजूने भाजून घ्या. जाम किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कमल गवळी, सांगली