शेवया | vermicelli recipe | sugarcane juice recipe

उसाच्या रसातील शेवया | समिता शेट्ये, रत्नागिरी | Vermicelli in sugarcane juice | Samita Shetye, Ratnagiri

उसाच्या रसातील शेवया

साहित्य: १०० ग्रॅम तांदळाचे पीठ, १०० मिली पाणी, १ छोटा चमचा वेलचीपूड, ६० मिली नारळाचे दूध, १२० मिली उसाचा रस, चवीनुसार मीठ, ५ ते ६ काड्या केशर, २ छोटे चमचे तूप, २ चमचे काजूचे भाजलेले तुकडे.

कृती: गॅसवर पाणी गरम करायला ठेवून त्यात तूप घालावे. उकळी आल्यावर मीठ आणि थोडे थोडे तांदळाचे पीठ घालून ढवळावे. एक वाफ काढून घ्यावी. मिश्रण थंड झाले की मळून त्याचे गोळे करून घ्यावे. पुन्हा पाणी उकळत ठेवून त्यात पिठाचे गोळे घालावे. गोळे पाण्याच्या वर आल्यावर गॅस बंद करावा. गोळे थंड झाल्यावर त्याच्या शेवया पाडून घ्याव्या. उसाचा रस ५ मिनिटे उकळून घ्यावा. थंड करून त्यात नारळाचे दूध, वेलचीपूड, केशर, काजू आणि वाफवलेल्या शेवया घालाव्या.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


समिता शेट्ये, रत्नागिरी

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.