Barfi | Barfi Recipe | Indian cooking | Indian cuisine

ज्वार्फी | प्रणिता कुलकर्णी, सातारा | Sorghum Barfi | Pranita Kulkarni, Satara

ज्वार्फी

साहित्य : १ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी साजूक तूप, / वाटी काळ्या खजुराची पेस्ट, ३ मोठे चमचे काजूपूड, / छोटा चमचा वेलचीपूड, सजावटीसाठी पिस्तापूड, चारोळी.

कृती : कढईत तूप गरम करून त्यावर ज्वारीचे पीठ भाजून लालसर करून घ्या. त्यामध्ये वेलचीपूड,  खजुराची पेस्ट, काजूपूड घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रण थंड झाल्यावर एका ताटाला तूप लावून त्यावर मिश्रण थापा. वरून पिस्तापूड, चारोळी घालून चौकोनी आकारात बर्फी कापा.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– प्रणिता कुलकर्णी, सातारा

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.