हलवा | Amorphophallus paeoniifolius | whitespot giant arum | halwa recipe

सुरणाचा हलवा | सुधा कुंकळीयेंकर, मुंबई | Elephant Foot Yam Halwa | Sudha Kunkaliyenkar, Mumbai

सुरणाचा हलवा

साहित्य: ४००-५०० ग्रॅम सुरण (शक्यतो पांढरा सुरण घ्या; त्याला खाज कमी असते), ३/४ वाटी ओले खोबरे, पाऊण ते एक कप साखर / चिरलेला गूळ (जरुरीप्रमाणे कमी / जास्त करा), १/२ छोटा चमचा लिंबाचा रस, ३-४ मोठे चमचे साजूक तूप, मीठ चिमूटभर, १ कप ताक, १/४ छोटा चमचा वेलचीपूड, सुका मेवा (आवडीनुसार).

कृती: सुरण स्वच्छ धुवून साले काढून, किसून घ्या. थोड्या पाण्यात ताक घालून त्यात किसलेला सुरण घाला व १५-२० मिनिटे ठेवा. एका कढईत २ मोठे चमचे साजूक तूप गरम करा. सुरणाचा कीस पिळून घ्या व गरम तुपावर २-३ मिनिटे परता. नंतर त्यावर झाकण ठेवून ५-६ मिनिटे वाफ काढा. सुरण जरा मऊ झाला पाहिजे. पाणी घालू नका. (कधी कधी सुरण पटकन शिजतो. त्यामुळे जरा लक्ष द्या. सुरण जास्त शिजवू नये.) आता कढईत खोबरे आणि साखर / गूळ घालून ढवळून घ्या आणि मंद आचेवर शिजवा. साखर / गूळ वितळेपर्यंत ढवळत राहा. लिंबाचा रस घालून घट्ट होईपर्यंत हे मिश्रण मंद आचेवर शिजवा. झाकण ठेवू नका. वेलची पूड, सुका मेवा व २ मोठे चमचे साजूक तूप घालून ढवळून घ्या. सुरणाचा स्वादिष्ट हलवा तयार आहे. गरम / गार सर्व्ह करा. हा हलवा फ्रिजमध्ये ३-४ दिवस चांगला राहतो.

टीप: कधी कधी सुरणामुळे हाताला खाज सुटते. अशा वेळी हाताला कोकम / चिंच चोळून २-३ मिनिटे ठेवा आणि नंतर साबण लावून हात धुवून टाका. हाताची खाज बंद होईल.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


सुधा कुंकळीयेंकर, मुंबई

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.