सूप | soup recipe | indian soup recipe

सुपर्ण सूप | मनोज पोतदार, नवीन पनवेल | Good Leaves Soup | Manoj Potdar, New Panvel

सुपर्ण सूप

साहित्य: २ वाट्या लाल भोपळा तसेच दुधी भोपळ्याच्या वेलीची कोवळी पाने (देठासहित बारीक चिरून), १ वाटी शेवग्याची कोवळी पाने, ७-८ पालकाची पाने, १/२ वाटी पुदिना पाने, एका गाजराचे काप, १ टोमॅटो कापून, १ वाटी इंद्रायणी तांदळाची पेज, २ तमालपत्र, १ इंच दालचिनीचा तुकडा, १ छोटा तुकडा आले, ४-५ मिरे, २ लवंगा, अर्ध्या लिंबाचा रस (आवडीनुसार), सैंधव मीठ व काळे मीठ (चवीनुसार). १ छोटा चमचा गाईचे तूप, १/२ छोटा चमचा जिरे, पाणी (गरजेनुसार).

कृती: मातीचे भांडे गॅसवर चांगले गरम झाल्यावर त्यात साजूक तूप व जिरे घालून फोडणी करा. त्यात तमालपत्र, दालचिनी, मिरे व लवंग टाका. थोडेसे परतून त्यात भोपळा, शेवगा, पालक व पुदिन्याची पाने चिरून टाका. आता यात ऌपाणी व गाजर-टोमॅटोचे काप टाकून चांगले उकळवून घ्या. थंड झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या व गाळणीने गाळून घ्या. यात भाताची पेज मिक्स करा. चवीनुसार सैंधव व काळे मीठ घालून हे मिश्रण उकळवा. मातीच्या भांड्यात शिजवल्यामुळे मातीचे आरोग्यदायी गुणधर्मपण यात उतरतात. आता हे गरमागरम सुपर्ण सूप वरून लिंबू पिळून पिण्यास द्या.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


मनोज पोतदार, नवीन पनवेल

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.