fbpx
रोल्स | Rolls Recipe | Prawns Roll

प्रॉन्स नेट रोल्स | माधुरी सोनाळकर, पुणे | Prawns net rolls | Madhuri Sonalkar, Pune

प्रॉन्स नेट रोल्स

साहित्य: ३ वाट्या तांदूळ, १ वाटी उडीद डाळ, मीठ (चवीनुसार).

सारणसाठी साहित्य: १ वाटी सोललेली कोलंबी, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, १/४ चमचा हळद, १/२ चमचा तिखट, १/२ चमचा गरम मसाला, मीठ (चवीनुसार), ४ लसूण पाकळ्या (फोडणीसाठी ठेचलेल्या), तेल.

वाटण: १/४  वाटी ओले खोबरे, आल्याचा तुकडा, ५-६ लसूण पाकळ्या व कोथिंबीर पाणी न घालता वाटून घ्या. त्यात २ चमचे चिंचेचा कोळ घाला.

कृती: तेलावर ठेचलेला लसूण परता, मग त्यावर कांदा परता. कोलंबीला हळद, तिखट, गरम मसाला व मीठ लावून कांद्यावर परता. वाटण घालून कोलंबी सुकी करा.

नेट रोल्सची कृती: तांदूळ व उडीद डाळ ४-५ तास भिजत घालून अगदी बारीक व पातळ सरसरीत वाटून घ्या. त्यात चवीप्रमाणे मीठ घाला. हे वाटलेले पीठ दुधाच्या पिशवीत भरा व पिशवीच्या एका टोकाला लहान कट द्या. आता नॉनस्टिक तव्यावर पिशवीच्या सहाय्याने आडवे-उभे घालून नेट तयार करा. नेट खाली काढून त्यात कोलंबीचे सारण भरून रोल तयार करा. याप्रमाणे नेट्स करून रोल्स तयार करा.

टीप: हे रोल्स् व्हेज-नॉनव्हेज दोन्ही प्रकारात करू शकतो. पीठ वाटल्यानंतर लगेच रोल्स केल्यावर नेटसाठी बारीक तार येते. पीठ आंबवल्यास तार जाड होते.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– माधुरी सोनाळकर, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.