Shrimp Jackfruit Tandoori Kabab Recipe

कोलंबी फणस तंदुरी कबाब | दर्पणा जाधव, मुंबई | Shrimp Jackfruit Tandoori Kabab | Darpana Jadhav, Mumbai

कोलंबी फणस तंदुरी कबाब

साहित्य॒: ७०० ग्रॅम कोलंबी, १ वाटी वाफवलेला फणस, /वाटी कोथिंबीर, १/छोटा चमचा आले-लसूण, ४-५ पुदिन्यांच्या पानांची पेस्ट, /छोटा चमचा लाल तिखट, /छोटा चमचा हळद, /छोटा चमचा धणेपूड, /छोटा चमचा जिरेपूड, ३-५ मोठे चमचे दही, १ मोठा चमचा तंदुरी मसाला, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा बेसन, १ कोळसा, १ चमचा तूप, २-४ मोठे चमचे तेल.

कृती: प्रथम एका बाउलमध्ये दही घेऊन त्यात वरील सर्व मसाले घाला. कोलंबी सोलून स्वच्छ धुऊन मिक्सरला वाटून घ्या. तसेच त्यासोबत वाफवलेला फणस वाटून घ्या. आता हे वाटून घेतलेले मिश्रण दह्यात घालून हाताने कालवून घ्या. त्यात कोथिंबीर, आले-लसूण, पुदिना पेस्ट व बेसन आणि मीठ घाला. मिश्रणाच्या मध्ये एक वाटी ठेवून त्यात गरम केलेला कोळसा ठेवा व वरून तूप सोडा आणि त्यावर ५ मिनिटे झाकण ठेवा. ५ मिनिटांनंतर मिश्रणातील वाटी काढून टाका. मिश्रण हाताने कालवा व त्याचे कबाब तयार करा. गॅसवर तवा गरम करून त्यावर २-४ चमचे तेल घालून कबाब दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करा. मस्त असे गरमागरम कबाब चटणीसोबत खायला तयार आहेत.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


 दर्पणा जाधव, मुंबई

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.