मशरूम | vegan mushroom wrap | mushroom wrap | sorghum wrap | sorghum millet | nutritious sorghum

मशरूम ज्वारी रॅप मशरूम मसाल्यासाठी | डॉ. मनीषा तालीम | Mushroom Sorghum Wrap For Mushroom Masala | Dr. Manisha Talim |

मशरूम ज्वारी रॅप मशरूम मसाल्यासाठी

साहित्य: १/२ किलो मशरूम, २ कांदे, १/४ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा लाल मिरची पावडर, १/२ छोटा चमचा गोडा मसाला, १/२ छोटा चमचा धणेपूड, १/२ छोटा चमचा जिरेपूड, १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, २ मोठे चमचे तेल, १/४ छोटा चमचा मीठ.

कृती: मशरूम धुवून, वाळवून घ्या. वाळवल्यानंतर मशरूमचे छोटे तुकडे करा. तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घाला व तो तांबूस रंगाचा होईपर्यंत परतवून घ्या. त्यात आले-लसूण पेस्ट घाला आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत साधारण मिनिटभर परतवून घ्या. आता सर्व मसाले वाटीत घ्या आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि मशरूम – कांद्याला व्यवस्थित लागतील अशा प्रकारे कढईत घाला. त्यावर झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवून घ्या.

रॅपसाठी साहित्य: १ वाटी ज्वारीचे पीठ, १ मोठा चमचा दही, चिमूटभर बेकिंग पावडर, २ मोठे चमचे तेल, पाणी, चिमूटभर मीठ

कृती: ज्वारीचे पीठ चाळून घ्या, त्यात मीठ व बेकिंग पावडर घाला. त्यानंतर त्यात दही आणि थोडे थोडे पाणी घालून पातळसर मिश्रण करून घ्या. छोट्या नॉनस्टिक तव्यावर १/२ छोटा चमचा तेल घालून त्यावर मिश्रण घाला. वर झाकण ठेवून प्रत्येक बाजू मध्यम आचेवर साधारण ५ मिनिटे शिजवून घ्या. ज्वारीच्या पॅनकेकवर मशरूम मसाला घाला आणि रोल करून त्याचा आस्वाद घ्या.

महत्त्व: मशरूममधून प्रथिने आणि फायबर हे घटक मिळतात. तसेच ‘ड’ आणि ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा तो एक स्रोत आहे. यात कमी कॅलरी असल्यामुळे तो एक उत्तम अल्पोपहार ठरतो. भारतात ज्वारी, बाजरी, नाचणी, बकव्हीट आणि बार्ली अशी मुबलक तृणधान्ये (होल ग्रेन्स) आहेत, पण त्यांचा वापर फारसा होत नाही. त्यांचा आहारात वापर करण्यास हळुहळू सुरुवात करावी (आठवड्यातून एकदा), जेणेकरून पोटाला अधिक तंतूमय पदार्र्थांची सवय होईल. ज्वारीमधील तंतूंमुळे वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) कमी होण्यास मदत होते. ज्वारीच्या पोळ्या, रॅप आणि पुलावही करता येऊ शकतो.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. मनीषा तालीम

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.