September 11, 2024
प्रथमोपचार पेटी | First Aid Box | First Aid Kit | Medical Kit | Aid Kit | Home First Aid Kit

प्रथमोपचार | डॉ. रा. वि. करंबेळकर, चिकित्सक | First Aid Box

प्रथमोपचार

फर्स्ट एड कीट अर्थात, प्राथमिक वैद्यकीय उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांचा आणि साधनांचा संग्रह! वैद्यकीय सल्लागारांकडे (डॉक्टर) पोहोचेपर्यंत घरच्या घरी किंवा इतरत्र जावयाचे प्राथमिक स्तरावरील उपचार म्हणजेच प्रथमोपचार.सध्याच्या धकधकीच्या जीवनात लहानमोठ्या आजारांसाठी किंवा किरकोळ जखमांसाठी दवाखान्यात जाणे अवघड असते, किंबहुना घरच्या घरीच तातडीने प्रथमोपचार करून वेळ आणि पैसा दोन्ही वाचवता येऊ शकते.रात्री-अपरात्री असे उपचार घेण्याची वेळ आली, तर घरात असणारे प्रथमोपचाराचे साहित्य आणि औषधे वापरून आपण दवाखाना उघडेपर्यंत रुग्णाला प्राथमिक उपचार देऊन त्याची काळजी घेऊ शकतो. सामान्यतः आढळणाऱ्या इजा जसे की, कापणे, पडणे, भाजणे, रस्त्यावरील किरकोळ अपघात झाल्यास तातडीने हे उपचार केले जातात.काही गंभीर आजारांमध्ये सुद्धा प्रथमोपचार देऊन दवाखान्यात पोहोचेपर्यंत आजाराची तीव्रता किंवा त्यातून उद्भवणारी गुंतागुंत आपण कमी करू शकतो. अशा वेळी घरची प्रथमोपचार पेटी खूप महत्त्वाची असते.प्रथमोपचार पेटीतील औषधे व साहित्य आणि तिचा वापर, ज्या परिस्थितीत व ज्या ठिकाणी करावयाचा आहे, त्याप्रमाणे बदलतात. या लेखात आपण घरात वापरण्यासाठी असणाऱ्या प्रथमोपचार पेटीमध्ये कोणती साहित्य व औषधे असावीत, याची माहिती घेऊया. घरगुती प्रथमोपचार पेटी मेडिकल स्टोअर्समध्ये तयार स्वरूपात उपलब्ध असते किंवा घरी सहज बनवता येते. ही पेटी साधी स्वच्छ बॉक्स वापरून तयार करता येते. त्या बॉक्सवर ठळक अक्षरात ‘FIRST AID BOX’/ ‘प्रथमोपचार पेटी’ असे लिहावे आणि त्यावर पांढरा क्रॉस करावा.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही पेटी सहज सापडेल, लक्ष जाईल अशा सुरक्षित जागी ठेवावी.

 

प्रथमोपचार पेटीत असायलाच हवे साहित्य :

१.प्रथमोपचार माहिती पुस्तिका/ डायरी – प्रथमोपचार कसे करावे अणि पेटीतील साहित्य कसे वापरावे, याची माहिती डॉक्टरांकडून घेऊन ती पेटीच्या आतील बाजूस चिकटवावी. जेणे करून ती सहज वापरता येईल.यात घरातील लोकांना विशिष्ट औषधांची, तसेच न चालणाऱ्या किंवा अॅलर्जी असणाऱ्या औषध / पदार्थांची नोंद जरूर करावी.

२. वेगवेगळ्या आज़राच्या चिकटपट्ट्या (Band Aids)

३. कापलेल्या किंवा जखम झालेल्या जागेवर कापूस ठेवून चिकटविण्यासाठी चिकटपट्ट्या (Sticking Plaster)

४. जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी (Gauze)

५. स्वच्छ कापूस : जखम स्वच्छ करणे, रक्त टिपणे यासाठी स्वच्छ कापसाची गरज असते.

६. छोटी कात्री.

७. रबरी हातमोजे : जखमी व्यक्तीचे रक्त व शरीरातील द्रव्यापासून आपला बचाव करण्यासाठी हातमोज्यांची गरज असते.

८. छोटा चिमटा : हाता-पायात गेलेला काटा किंवा काच काढण्यासाठी छोटा चिमटा आवश्यक असतो.

९. जीवरोधक द्रव्य (अँटिसेह्रिश्वटक लोशन) जखमेवरील जंतूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी डेटॉल / सॅव्हलॉन इत्यादी जीवरोधक द्रव्ये.

 

प्रथमोपचारपेटीत असणारी साधने

१०. साबण

११. ज्वरमापक (थर्मामीटर)

१२. मलमे : बरनॉल, आयोडेक्स, व्हॅसलीन, केलास जीवन यासारखी प्राथमिक मलमे प्रथमोपचार पेटीत असणे गरजेचे आहे.

१३. विजेरी (Torch)

१४. स्वच्छ व सुके कपडाचे तुकडे (Lint)

१५. क्रेप बॅन्डेज : मुरगळलेल्या अवयवाला किंवा सुज, मार लागलेल्या जागीआधार म्हणून बांधण्यासाठी क्रेप बॅन्डेज गरजेचे आहे.

 

औषधे (किंवा तत्सम जेनेटिक) :

१. पॅरासिटॅमॉल (५०० mg): ताप कमी करण्यासाठी किंवा डोकेदुखी, अंगदुखीसाठी.

२ . आयबोप्रोफेन किंवा डायक्लोफिनेक सोडियम : वेदना व सूज कमी करण्यासाठी.

३. लोपेरामाईड : अतिसार किंवा जुलाब कमी करण्यासाठी.

४. ओरल रिहायड्रेशन सॉल्ट् (ORS) : अतिसार / जुलाब होऊन शरीराचे डीहायड्रेशन टाळण्यासाठी इलेक्ट्रॉल यासारख्या पावडरचे पाज़ीट.

५. सेट्रीझीन (१०mg) : अॅलर्जी किंवा अंगावर उठलेल्या गांधीसाठी.

६. डॉमपेरीडोन (१०mg) : उलट्या थांबविण्यासाठी.

७. रॅनिटीडीन (१५०mg) : आम्लपित्तरोधक अर्थात, अॅसिडिटीवर फायदेशीर.याचबरोबर इनो किंवा गॅसोफास्ट तत्सम पित्तरोधकही प्रथमोपचार पेटीत ठेवायला हवे.

८. हायोसीन ब्युटाईल ब्रोमाईड : पोटदुखीवर.

९. क्लोट्रिमायझोल क्रीम :नायट्यावर लावण्यासाठी.

१०. पोव्हीडोन आयोडीन (बिटाडीन) : हे जंतुनाशक द्रव्य जखम स्वच्छ करण्यासाठी व जखमेवर ड्रेसिंग म्हणून लावण्यासाठी.

११. अल्ज़ेहोल / स्पिरीट : कधीही थेट जखमेवर लावू नये.जखमेभोवतालची त्वचा स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करावा. स्पिरीटने त्वचा स्वच्छ केल्यास चिकटपट्टी व्यवस्थित चिकटते.

१२. सोफ्रामायसीन क्रीम छोट्या /वरवरच्या जखमेवर लावण्यासाठी जंतुनाशक मलम.

१३. घरातील व्यक्तींना नेहमी लागणारी विशिष्ट औषधे. वरील औषधे व साहित्य आपल्याकडील प्रथमोपचार पेटीत असायला हवीत. त्याचबरोबरअत्यावश्यक दूरध्वनी क्रमांकांचीही नोंद आपण ठेवायला हवी. जवळची रुग्णालये, रुग्णवाहिका, फॅमिली डॉक्टर, आपत्कालीन काळात संपर्क साधण्यायोग्य व्यक्तीचा संपर्क क्रमांक आदी माहिती या पेटीसोबत असायला हवी.

 

प्रथमोपचार पेटी वापरताना घेण्याची ज़ळजी :

१. सर्व औषधांबद्दल, त्यांच्या वापराबद्दल, डॉक्टरांकडून व्यवस्थित माहिती करून घ्यावी.

२. औषधे वेळोवेळी तपासून, ती मुदतबाह्य झाली नाहीत ना, याची खात्री करावी. जरूर तशी परत भरून ठेवावी म्हणजे ऐन वेळी तारांबळ उडणार नाही.

३. प्रथमोपचार हा तात्पुरता उपचार आहे. त्यामुळे लहान जखमांवर हे उपाय चालतील. मात्र मोठी जखम झालेली असल्यास किंवा गंभीर त्रास जाणवत असल्यास प्रथमोपचारानंतर शक्य तितक्या लवकर वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. रा. वि. करंबेळकर, चिकित्सक

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.