पुलाव | pulaos | rice pulao | ingredients for pulao | pulao ingredients | non veg pulav recipe | pulav recipe in marathi | homemade pulav recipe

वन पॉट चिकन पुलाव | गिरीजा नाईक | One Pot Chicken Pulav | Girija Naik

वन पॉट चिकन पुलाव

साहित्य: १/२ किलो बोनलेस चिकन तंगडी किंवा तंगडीचा खालचा भाग, ११/४ कप दही, सव्वा कप लांब दाण्यांचा बासमती तांदूळ, २ मोठे चमचे बिर्याणी मसाला, चिमूटभर केसर, १/२ चमचा बडीशेप, १/२ चमचा जिरे, १ छोटे दगडीफूल, २ तमालपत्र, १/२ लिंबाचा रस, २ उभे चिरलेले कांदे, १ टोमॅटो (बारीक कापलेला),  १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्या, २१/४ कप गरम पाणी, १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना, १ मोठा चमचा तेल, २ मोठे चमचे तूप व चवीनुसार मीठ.

कृती: एका मोठ्या बाऊलमध्ये तांदूळ धुऊन ३० मिनिटे भिजवत ठेवा.बडीशेप, जिरे व दगडीफूल भाजून त्याची पूड तयार करा.त्यांनतर कढईत एक चमचा तूप व तेल घेऊन गरम करा.त्यात चिरलेला कांदा लालसर होईस्तोवर परतवा.त्यात चिकन चांगले तळून घ्या.नंतर हिरव्या मिरच्या, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट घालून दोन मिनिटे चांगले परतवून घ्या.त्यात चवीनुसार मीठ, बिर्याणी मसाला, जिरे-बडीशेप-दगडीफूल पूड, चिरलेली बारीक कोथिंबीर व पुदिना घाला.मिश्रण चांगले एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून चार-पाच मिनिटे शिजू द्या.नंतर त्यात फेटलेले दही, लिंबाचा रस घाला व नीट मिक्स करा.झाकण ठेवून मंदाग्नीवर चार-पाच मिनिटे शिजू द्या.भिजवलेला तांदूळ गाळून घ्या व मिश्रणात हळुवारपणे एकत्र करा.सव्वा दोन कप गरम पाणी घालून झाकण ठेवा.उकळी आल्यानंतर यात केशर घाला.पुन्हा ढवळून घ्या.वीस ते पंचवीस मिनिटे मंदाग्नीवर झाकण ठेवून उकळी येऊ द्या.चिकन पुलाव शिजल्यानंतर सर्व्ह करा.

टीप: तांदूळ मिश्रणात घालताना तो तुटणार नाही, याची काळजी घ्यावी.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


गिरीजा नाईक

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.