स्मोकी पनीर टिक्का सँडविच | प्रीती गुप्ते, नाशिक | Smoked Paneer Tikka Sandwich | Priti Gupte, Nashik

Published by प्रीती गुप्ते, नाशिक on   December 3, 2021 in   Recipes

स्मोकी पनीर टिक्का सँडविच

साहित्य : १ चमचा मोहरी, १ चमचा काश्मिरी लाल तिखट, १ चमचा धणे पावडर, १ चमचा आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा काळे मीठ, १ चमचा आमचूर पावडर, १ कप ताजे दही, २ चमचा भाजलेले बेसन, १ चमचा लिंबाचा रस, १ वाटी चिरलेली हिरवी ढोबळी मिरची, १ चमचा चिरलेला बारीक टोमॅटो (बिया काढलेल्या), १ कप चिरलेला कांदा, २ वाटी किसलेले पनीर, आवश्यकतेनुसार तेल, मीठ व चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला, मेयोनीज, टोमॅटो सॉस, ब्राउन ब्रेड, आवश्यकतेनुसार लोणी, बर्न कोळसा, हिरवी चटणी.

कृती : सर्वप्रथम कढईत तेल घेऊन मोहरी, काश्मिरी लाल तिखट, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, धणे पावडर, गरम मसाला, काळे मीठ, आमचूर पावडर, मीठ, ताजे दही, भाजलेले बेसन, चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, चिरलेली हिरवी ढोबळी मिरची, चिरलेला बारीक टोमॅटो, चिरलेला कांदा व किसलेले पनीर चांगले मिक्स करून दहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. गॅस बंद केल्यानंतर बर्न कोळसा शिजविलेल्या मिश्रणात घालून काही मिनिटांसाठी स्मोक करा. ब्राउन ब्रेडच्या एका स्लाइसला लोणी, हिरवी चटणी व तयार केलेले मिश्रण लावा. ब्रेडच्या दुसऱ्या स्लाइसला मेयोनीज, चाट मसाला व टोमॅटो सॉस लावून घ्या. हे सँडविच बेक करून घ्या. हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा. स्मोकी पनीर टिक्का सँडविच तयार

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– प्रीती गुप्ते, नाशिक