स्टिक्स | chocolate orange sticks | chocolate covered orange sticks | sweets orange sticks | orange sticks candy

चॉकलेट ऑरेंज स्टिक्स | बिंबा नायक | Chocolate Orange Sticks | Bimba Nayak

 

चॉकलेट ऑरेंज स्टिक्स

साहित्य : २ संत्री (जाड साल असलेली), १ वाटी साखर, १ कप पाणी, १२५ ग्रॅम डार्क चॉकलेट.

कृती : संत्र्याचे चार भाग करा. संत्र्याच्या सालींचा नारिंगी भाग काढा, पण सालींचा जाडसर भाग राहू द्या. गरासह संत्र्याचे साधारण एक सें.मी. जाडीचे काप / पट्ट्या कापून घ्या.
संत्र्याच्या या पट्ट्या उकळत्या पाण्यात घाला, उकळी आल्यावर पाणी काढून टाका. ही कृती आणखी दोन वेळा करा. आता एका पातेल्यात पाणी आणि साखर घ्या. पातेले गॅसवर ठेवून साखर विरघळेपर्यंत ढवळत राहा. उकळी आणू नका. संत्र्याच्या पट्ट्या त्यात घाला, उकळी आल्यावर गॅस कमी करा. आता पातेल्यावर झाकण न ठेवता पाच ते दहा मिनिटे किंवा संत्र्याच्या पट्ट्या अर्धपारदर्शक होईपर्यंत उकळू द्या. वेळोवेळी पळी फिरवत राहा. दोन काटे- चमचे किंवा चिमट्यांचा वापर करून संत्र्याच्या सालींच्या पट्ट्या जाळीवर किंवा चाळणीवर ठेवा. रात्रभर सुकू द्या. उकळत्या पाण्यात चॉकलेट वितळवून घ्या. आता यात संत्र्याच्या पट्ट्या घाला. दोन काटे-चमच्यांनी किंवा चिमट्याने या पट्ट्या चॉकलेटमधून बाहेर काढा. त्या हलवून अतिरिक्त चॉकलेट निथळू द्या. चॉकलेट सेट होईपर्यंत ते अॅल्युमिनियम फॉईलवर ठेवा. वातावरण थंड नसेल (गरम किंवा दमट असेल) तर या चॉकलेट स्टिक्स फ्रीजमध्ये ठेवून सेट कराव्या लागतील. फ्रीजमध्ये या स्टिक्स उभ्या डब्यात ठेवा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


बिंबा नायक

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.