माहीम | Mahim Halwa | Mahimcha halwa | halwa recipe | Mahim ka halwa | Mahim halwa online | layered semolina sweet 

फळाचा माहीम हलवा | वेदश्री प्रधान, माहीम | Fruit Mahim Halwa | Vedashree Pradhan, Mahim

फळाचा माहीम हलवा

साहित्य : १ कप आंबा / पपई / केळी यांचा गर, १/२ कप दूध, ४ मोठे चमचे साखर, ४ मोठे चमचे काजू पावडर, ४ मोठे चमचे मिल्क पावडर, सजावटीसाठी केशर व पिस्ता.

कृती : प्रथम जाड बुडाच्या कढईत दूध उकळत ठेवा. त्यात साखर आंबा / पपई / केळी यापैकी एकाचा गर घाला. त्यात काजू पावडर घालून मिश्रण सतत ढवळत राहा. घट्ट होत आल्यावर त्यात मिल्क पावडर घालून गोळा बनवा. हा गोळा आता प्लॅस्टिक पेपरवर थापून लाटण्याने चौकोनी लाटा. अगदी पातळ लाटून झाला, की त्यावर केशराचे धागे व पिस्त्याचे काप घालून वरून दुसरा पेपर लावून लाटून घ्या. थंड झाल्यावर पेपर काढा. फळाचा माहीम हलवा तयार.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वेदश्री प्रधान, माहीम

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.