स्वीट कॉर्न चीज केक | स्वाती जोशी, पुणे | Sweet Corn Cheese Cake | Swati Joshi, Pune

Published by स्वाती जोशी, पुणे on   October 8, 2021 in   Dessert Special

स्वीट कॉर्न चीज केक

बेससाठी साहित्य : १/२ कप पिवळे मका पीठ, १/४ कप कॉर्नफ्लोअर, २ चमचे मैदा, १/४ कप बटर, ३-४ चमचे पिठीसाखर, १/२ चमचा बेकिंग पावडर, थंड पाणी.

कृती : सर्वप्रथम पिवळे मका पीठ, कॉर्नफ्लोअर, मैदा, बटर, पिठीसाखर, बेकिंग पावडर व थंड पाणी एकत्र करून पीठ मळून त्याच्या कुकीज बनवा. २००० सेल्सिअसवर पंधरा मिनिटे ह्या कुकीज बेक करा. थंड झाल्यानंतर क्रश करून त्यात अर्धा कप वितळलेले बटर घाला. तयार केलेले मिश्रण मोल्डमध्ये भरून फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनिटे ठेवा.

फिलिंगसाठी साहित्य : मक्याच्या कणसाचे दूध काढून त्याचे विरजण लावून त्यापासून तयार केलेला १/२ कप चक्का, १/४ कप साधा चक्का, १/४ कप पनीर, १/२ कप कंडेन्स्ड मिल्क, चिमूटभर वेलची, ११/२ चमचा केशर व जिलेटीन.

कृती : जिलेटीनमध्ये पाणी घालून वीस सेकंद मायक्रोव्हेव करा. मक्याच्या दुधाचा चक्का, साधा चक्का, पनीर, कंडेन्स्ड मिल्क, वेलची पावडर व केशर एकत्र करून हँड ब्लेंडरने एकजीव करा. मायक्रोव्हेव केलेले जिलेटीन या मिश्रणात घालून पुन्हा सर्व एकजीव करा. तयार बेसवर वरील मिश्रण पसरवून घ्या.

टॉपसाठी : १ किसलेला मका, १ मोठा चमचा तूप, ३/४ कप दूध, ३-४ चमचे साखर, वेलची पूड, केशर, खवा, चीझ, पिस्त्याचे काप.

कृती : कढईत एक मोठा चमचा तूप घाला. त्यात किसलेला मका परतून घ्या.आता यात दूध घालून वाफ  येऊ द्या. मग यात साखर व नंतर वेलची पूड, केशर व खवा घाला. झाकण ठेवून छान शिजवा. तयार केकवर हे मिश्रण पसरवून चीझ व पिस्त्याच्या कापांनी सजवा. स्वीट कॉर्न चीज केक तयार.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– स्वाती जोशी, पुणे