शाकाहारी-मासांहारी स्नॅक्स | मीना कुलकर्णी | Marathi Recipe | Food Recipe | Kalnirnay Recipe | Kalnirnay Blog

(शाकाहारी-मासांहारी स्नॅक्स) हिवाळ्यातील हिरवाई – मीना कुलकर्णी

शाकाहारी-मासांहारी स्नॅक्स


साहित्य: १ वाटी हुरडा, १ वाटी ओल्या गव्हाचे दाणे, १ वाटी ओला हरभरा, १ वाटी ओल्या तुरीचे दाणे, १ वाटी ओला मटार, १ वाटी हिरवा मूग (ताजा न मिळाल्यास आदल्या दिवशी कडधान्यातील मूग भिजवून दुसऱ्या दिवशी घ्यावा), १ वाटी पालक, १ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, १ वाटी कोथींबीर, १/२ चमचा ओवा, १ चमचा बडीशेप, २ चमचे तीळ, हिरवी मिरची, मीठ, आले, लसूण, तळण्यासाठी तेल.

कृती(शाकाहारी-मासांहारी स्नॅक्स):  हुरडा, गव्हाचे दाणे, हरभरा, तुरीचे दाणे, मटार, मूग हे सगळे मिक्सरमधून किंचीत जाडसर वाटून घ्या. त्यात चवीप्रमाणे आले, लसूण, मिरची व जिरे यांची पेस्ट घाला. नंतर यात कांद्याची पात, पालक, कोथिंबीर बारीक चिरून टाका. त्यात चवीनुसार मीठ, ओवा, बडीशेप व तीळ टाकून चांगले एकजीव करून घ्या. त्यात दोन चमचे कडकडीत मोहन घाला. छोटे छोटे वडे तळा व गरम गरम वडे चटणीबरोबर सर्व्ह करावे.

चटणी साहित्यः- २-३ लाल टोमॅटो, लाल मिरच्या (पाण्यात भिजत ठेवाव्या), जिरे, मीठ, दही, साखर, हिंग.

कृतीः- टोमॅटोच्या फोडी करून त्यात मिरच्या, जिरे, मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात दही, किंचीत साखर घालून वरून हिंगाची फोडणी द्या व हिरव्या वड्याबरोबर लाल चटणी द्या.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

मीना कुलकर्णी

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.