रिबन सँडविच

Published by डॉ. मोहसिना मुकादम on   April 10, 2019 in   2018Food CornerTiffin Box

रिबन सँडविच बनवण्यासाठी लागणारे


 • साहित्य:
 1. सँडविच ब्रेड
 2. मस्का
 3. बेसन
 4. मीठ
 5. हळद
 6. तेल
 7. ४-५ बटाटे (हळद व मीठ घालून उकडलेले).
 • हिरवी चटणीः
 1. १ कप कोथिंबीर
 2. १/२ कप पुदिना
 3. १ लहान तुकडा आले
 4. ३-४ लसूण पाकळ्या
 5. २ हिरव्या मिरच्या
 6. १/२ टीस्पून जिरे
 • लाल चटणीः
 1. २-३ टोमॅटो
 2. १ टीस्पून लाल तिखट
 3. १/४ कप टोमॅटो सॉस
 4. १ छोटा बीटचा तुकडा
 • कृतीः
 1. हिरव्या चटणीचे सर्व साहित्य एकत्र वाटा व घट्ट चटणी करा. टोमॅटो उकळत्या पाण्यात घालून त्याची साले काढा व बारीक तुकडे करा, बीट किसून घ्या. थोड्याशा तेलात टोमॅटो, बीट परतून घ्या. त्यात चवीनुसार लाल तिखट, मीठ घालून दाटसर शिजवून घ्या. त्यात टोमॅटो सॉस घाला.
 2. बटाट्याची साले काढून किसून घ्या. चवीनुसार मीठ घाला व एकजीव करा. ब्रेडच्या कडा कापून प्रत्येक स्लाईसला मस्का लावा. पहिल्या स्लाईसला हिरवी चटणी लावा. त्यावर मस्का लावलेली बाजू वर येईल त्याप्रमाणे दुसरी स्लाईस लावा. त्यावर बटाट्याचे मिश्रण पसरवा. त्यावर तिसरी ब्रेड स्लाईस ठेवा. त्यावर टोमॅटोची लाल चटणी लावा.
 3. सर्वात वर मस्का लावलेली बाजू खाली येईल अशी चौथी स्लाईस ठेवा व हलके दाबा.
 4. बेसनात चवीनुसार मीठ व हळद घालून त्याप्रमाणे पीठ भिजवा. अख्खे सँडविच भज्याच्या मिश्रणात नीट भिजवा. सर्व बाजूने पीठ लागले पाहिजे. गरम तेलात तळा. सर्व्ह करताना प्रत्येक सँडविचचे तीन उभे तुकडे करा. चटण्यांची बाजू दिसेल असे प्लेटमध्ये ठेवा. आतमध्ये चटणी असल्याने वेगळी चटणी व सॉस देण्याची आवश्यकता नाही.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


 डॉ. मोहसिना मुकादम