घोळची वडी | जयश्री शिंदे | रानभाज्या

Published by जयश्री शिंदे on   August 4, 2021 in   रानभाज्या

घोळ ची वडी

मराठी नाव : घोळ

इंग्रजी नाव : Common Purslane

शास्त्रीय नाव : Portulaca Oleracea

आढळ : हे शेत व बागेतील तण आहे‧ ओलसर व पाणथळ जागी आढळून येते‧

कालावधी : वर्षभर

वर्णन : घोळ ही जमिनीवर पसरत जाणारी वनस्पती आहे. याचे खोड मांसल आणि तांबूस असते तर पाने साधी, मांसल आणि हिरवी असतात. पानांचा आकार टोकाला गोल आणि देठाजवळ निमुळता असतो. पानांना देठ नसतो. पाने चवीला आंबटसर असतात, तसेच पाने तोडली असता बुळबुळीत रस बाहेर येतो.

साहित्य : २ वाट्या घोळची भाजी, २ वाट्या ज्वारीचे पीठ, ६ हिरव्या मिरच्या, छोटा तुकडा आले, ८ ते १० पाकळ्या लसूण, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ.

कृती : घोळची भाजी स्वच्छ धुऊन बारीक चिरावी. हिरव्या मिरच्या, आले, लसूण, जिरे वाटून घ्यावे. आता ज्वारीच्या पिठात चिरलेली भाजी, वाटलेला हिरवा मसाला, हळद, मीठ घालून मळावे. गरजेनुसार पाणी घालावे. त्याचे उंडे तयार करून चाळणीत ठेवून पंधरा मिनिटे वाफवून घ्यावे. गार झाल्यावर त्याच्या वड्या कापून तव्यावर थोडे थोडे तेल सोडून दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्याव्यात.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– जयश्री शिंदे