मूगडाळ कोशिंबिरी – डॉ. मोहसिना मुकादम

Published by डॉ. मोहसिना मुकादम on   May 7, 2019 in   2019Food Corner

मूगडाळ कोशिंबिरी

साहित्य

  • १/३ कप पिवळी मूगडाळ,
  • १ मोठी काकडी,
  • १/३ कप ओले खोबरे,
  • १ मिरची,
  • मुठभर कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर व लिंबू.

 

कृती

मूगडाळ अर्धा तास भिजवून नंतर ती चाळणीवर काढून त्यातील पाणी निथळू घ्यावे.काकडी चोचवून घ्यावी.मिरची बारीक चिरावी. कोथिंबीर चिरावी. नंतर भिजवलेली मूगडाळ,काकडी,किसलेले ओले खोबरे,मिरची,कोथिंबीर,मीठ,साखर हे सर्व एकत्र करावे. त्यात वरून लिंबाचा रस घालावा.आवडत असल्यास वरून हिंग-मोहरीची फोडणी द्यावी.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. मोहसिना मुकादम