गावा डेलिकेसी (मॉकटेल) | शेफ निलेश लिमये | Guava Mocktail

Published by शेफ निलेश लिमये on   May 31, 2019 in   2019Food Corner

गावा 


साहित्य : पेरू, ३ छोटे चमचे मध, २ छोटे चमचे लिंबाचा रस, चवीनुसार लाल मिरची पावडर आणि काळे मीठ, ८ पुदिन्याची पाने सजावटीकरिता

 

कृती : प्रथम पेरू(गावा) स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याचे चौकोनी काप करावेत. पेरूचे काप गॅसवर गरम पाण्यात ८१० मिनिटांकरिता शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर शिजवलेले पेरू व थोडे पाणी घालून ब्लेंडरमधून ज्यूस करून घ्यावा. गाळणीने तो गाळून घ्यावा. ज्यूसच्या जारमध्ये पेरूचा ज्यूस, मध, लाल मिरची पावडर व काळे मीठ घालून एकत्र ढवळून घ्यावे. फ्रिजमध्ये थंड करायला ठेवावे. पुदिन्याची पाने घालून थंडगार ज्यूस सर्व्ह करावा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


शेफ निलेश लिमये