उकडीचे मोदक | Ukadiche Modak | Easy Modak Recipe

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक


साहित्य : वासाचा तांदूळ धुवून, वाळवून व दळून आणणे, त्याला पिठी असे म्हणतात. पिठी, किंचित मीठ, पाणी, तेल किंवा लोणी.

सारण : नारळ खवून घेतलेला, गूळ चिरलेला, खसखशीची भाजून केलेली पूड, वेलदोड्याची पूड, जायफळ किसून.

कृती : प्रथम खवलेला नारळ व बारीक चिरलेला गूळ एकत्र करावे व मंद आचेवर ढवळावे. गूळ विरघळल्यावर खसखशीची पूड, वेलदोडा व जायफळाची पूड घालून मिश्रण गार होऊ द्यावे.

पारीसाठी जितकी तांदळाची पिठी तितक्या वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळू लागले की त्यात दोन चमचे तेल किंवा लोणी घालावे व त्यात पिठी घालून झाकण ठेवून भरपूर वाफ काढून घ्यावी व खाली उतरून घ्यावे. ही उकड गरमगरमच चांगली मऊ मळून घ्यावी. हाताला तेल लावून घ्यावे व ह्या उकडीची पारी करावी. पारी पातळ करावी. त्यात चमच्याने नारळाचे सारण भरावे व अंगठा व मधले बोट ह्यांच्या साहाय्याने खालून वर अशा पद्धतीने नाजूक हातांनी मोदकाच्या मुखऱ्या पाडाव्यात व शेवटी तोंड बंद करून मोदकाला बेताचे नाक ठेवावे. मोदकपात्राला तुपाचा हात लावून घ्यावा व हे वळलेले मोदक त्यावर ठेवून उकडून घ्यावेत. गरमागरम उकडीचे मोदक फोडून त्यावर साजूक तूप घालून खायला द्यावेत. केळीच्या पानावरही उकडून हे मोदक छान लागतात.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कालनिर्णय स्वादिष्ट सप्टेंबर २०१२

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.