रोटी | रोटी स्टिक, सालसा डीप | पद्मजा देशपांडे | Roti Stick | Home Made Recipe

रोटी स्टिक, सालसा डीप | पद्मजा देशपांडे | Roti Stick, Salsa Dip | Home Made Recipe

रोटी स्टिक, सालसा डीप

साहित्य स्टिकसाठी:

२ शिळ्या पोळ्यांचा मिक्सरवर बारीक केलेला चुरा,

२ चमचे पोह्याचे पीठ, १ चमचा मैदा, १ चमचा तीळ, १ चमचा धणे- जिरे पूड,

१/२ चमचा लाला तिखट, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, ८-१० कढीपत्त्याच्या पानांची बारीक कुस्करून भरड, टाळण्यासाठी तेल, पाणी.

कृती: पोळीचा चुरा, पोह्याचे पीठ, मैदा, तीळ, धणे-जिरे पूड, तिखट, हिंग, मीठ, कढीपत्ता पणे एकत्र  करून पाणी घालून माळून घ्या. याचा बोराऐवढा गोळा घेऊन हाताने लांबट स्टिक तयार करा व मंद आचेवर खमंग तळा.

सालसा साहित्य: १ कांदा, ३ टोमॅटो व  १ ढोबळी मिरची बारीक चिरून, १/४ वाटी कोथिंबीर, १/४ चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, १/४ चमचा मिरपूड, १ चमचा साखर, १/२ चमचा लिंबूरास, २ चमचे टोमॅटो साँस, १ चमचा बटर.

कृती: बटरवर कांदा परतून घ्या. मग ढोबळी मिरची घालून परत. थोडे मऊ झाले की टोमॅटो व मीठ घालून झाकण ठेवून शिजू द्या. शिजलेले हे सारण स्मँश करा. त्यात तिखट, साखर, मिरपूड, दालचिनी पूड, टोमॅटो साँस घालून एक वाफ काढून घ्या. नंतर त्यात कोथिंबीर लिंबूरस घालून गॅस बंद करा. सालसा डीपसोबत रोटी स्टिक सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


पद्मजा देशपांडे

(पाकनिर्णय २०२० विजेता)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.