रोझ कलाकंद टार्ट | ममता कलमकर | Rose Tart | Tart Recipes

Published by ममता कलमकर on   March 16, 2020 in   2020Paknirnay Recipe

रोझ कलाकंद टार्ट

साहित्य :

स्वीट पेस्ट टार्टसाठी : ४ कप मैदा, ११/२ कप आइसिंग शुगर, ११/४ कप लोणी.

कलाकंद फिलिंगसाठी : १/२ कप मैदा, १ कप बदाम पावडर, ३/४ कप कॅस्टर शुगर, ११/४ कप लोणी, ११/२ मोठे चमचे गुलाब जल, ५ ग्रॅम मिक्स नट्स, २-३ कलाकंद, रोझ क्रीम.

कोकोनट स्नोकरिता : १ मोठा चमचा रोझ सिरप, १/२ कप क्रीम, १ मोठा चमचा खोबऱ्याचा कीस.

कृती :

स्वीट पेस्टसाठी : प्रथम क्रीम लोणी व आइसिंग शुगर हलक्या हाताने फेटा. मग त्यात थोडा मैदा घालून व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर दोन तास फ्रीजमध्ये सेट होऊ द्या.

कलाकंद फिलिंगसाठी– क्रीम, लोणी, कलाकंद व कॅस्टर शुगर ब्लेंडरने एकत्र फेटून मिश्रण हलके करून घ्या. थोडेथोडे करून त्यात कणीक, बदाम पावडर व थोडे गुलाब जल घाला. स्नो व्हिप क्रीममध्ये गुलाब जल व गुलाब सिरप घालून घ्या. खोबऱ्याच्या किसात गुलाब सिरप घालून घ्या. टार्ट मोल्डमध्ये स्वीट पेस्ट व्यवस्थित
पसरवून त्यावर बदाम क्रीमचे मिश्रण घालून व्यवस्थित पसरवून घ्या. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या नीट रचून १७०० सेल्सिअसला पंचवीस ते तीस मिनिटे बेक करा. थंड झाल्यावर त्रिकोणी आकारात कापून त्यावर रोझ क्रीम, बारीक कापलेले नट्स पेरून पिंक कोकनट स्नोच्या साहाय्याने गार्निश करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


ममता कलमकर