खमंग वाटली डाळ | अलका फडणीस | Dhokla Vatli Dal | Alka Fadnis | Kalnirnay Recipe

Published by अलका फडणीस on   June 7, 2019 in   2019Food Corner

 

साहित्य(डाळ) : २ वाट्या टाटा संपन्न चणाडाळ ( २ तास भिजवून रुमालावर कोरडी करून जाडसर वाटणे ), /२ चमचा टाटा संपन्न हळद, २ बारीक चिरलेले कांदे, २ हिरव्या मिरच्या, ५ लसूण पाकळ्या, १ चमचा जिरे – (हिरवी मिरची, लसूण जिरे वाटून घेणे), /२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे, १ चमचा साखर, /२ चमचा मोहरी, /४ चमचा हिंग, अर्ध्या लिंबाचा रस, सर्व्हिंगसाठी बारीक शेव, /४ वाटी तेल, /४ वाटी ओले खोबरे.

 

कृती :कढईत तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी आणि हिंग घाला. त्यावर कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता. त्यावर हळद, आलेलसूणहिरवी मिरचीचे वाटण घालून परता. नंतर मीठ आणि साखर घालून नीट परता. त्यावर जाडसर वाटलेली डाळ घालून परता. वर झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ आणा. अर्धी कोथिंबीर आणि वाटल्यास थोडेसे पाणी घाला. डाळ मऊ शिजल्यावर गॅस बंद करा. लिंबाचा रस घाला. सर्व्ह करताना त्यावर खोबऱ्याचा कीस, कोथिंबीर आणि बारीक शेव घालावर लिंबाची फोड ठेवा.

 

अजुन काही महत्त्वाच्य रेसिपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या


अलका फडणीस