Blog

रथसप्तमी

माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ असे विशेष नाव आहे. ह्या दिवसाला धर्मकार्यात तसेच सूर्योपासनेतही अतिशय महत्त्व आहे. ‘व्रतासाठी ही सप्तमी अरुणोद्यव्यापिनी घ्यावी’ – असे धर्मधुरिणांनी लिहून ठेवले आहे. व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकभुक्त (एक वेळ जेवून-) राहावे. सप्तमीला पहाटेच शुचिर्भूत व्हावे. नंतर शक्य होईल त्या धातूचा दिवा लावावा. सूर्याचे ध्यान करुन तो दिवा वाहत्या पाण्यात […]

नारळाच्या दुधातील मोदक

नारळाच्या दुधातील मोदक बनविण्यासाठी – साहित्य: तांदळाची पिठी पाणी प्रत्येकी १ वाटी नारळाचे दूध अर्धी वाटी मीठ चवीपुरते भाजलेल्या खसखशीची पूड – २ चमचे पाव वाटी साखर अर्धी वाटी खवा कृती: एका नारळाचा चव घेऊन त्यात कोमट पाणी घालून दूध काढून घ्यावे. उरलेला चव जितका भरेल त्याच्या निम्मा गूळ घ्या. त्यात पाव वाटी साखर, अर्धी […]

Your Body | Healthy Body Tips | natural food for glowing skin | self health care healthy balanced diet | healthy lifestyle habits | 5 healthy habits for students

Eat, Pray, Love: Your Body | Dr Sarita Davare | Utility Calmanac 2018

  A diet that recommends you eat only fruits or only salads is not practical. A balanced diet comprises the right ratio of proteins, fibre, fat and carbohydrates to fulfil your requirements. A healthy diet is not limited to what one eats. It is a proper balance of nutrients and varied food groups. ‘I’ve eaten a […]

न्यायमूर्ती रानडे

लोकोत्तर महापुरुषांच्या असामान्य गुणांचे दर्शन त्यांच्या लहानपणीच घडू लागते. न्यायमूर्ती रानडे याची शांत, समंजस, न्यायी वृत्ती अशीच त्यांच्या लहानपणीच्या अनेक घटना-प्रसंगांमधून दिसून येते. घरातील खांबाकडून पराभव एकदा आईने माधवाच्या दोन हातांवर बर्फीचे दोन तुकडे ठेवले त्यातील मोठा तुकडा माधवासाठी आणि लहान तुकडा मोलकरणीच्या मुलासाठी होता, पण ते सांगावयास आई विसरली. परिणामी छोट्या माधवाने मोठा तुकडा […]

मकरसंक्रात | मकरसंक्रांति | Tilgul | Kite Flying | Hindu Festival

मकरसंक्रात

मकरसंक्रात   मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. दक्षिणेकडे याचवेळी ‘ पोंगल ‘ म्हणून जो सण साजरा होतो, तोदेखील तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी ‘ भोगी पोंगल ‘ अथवा इंद्रपोंगल म्हणून तो इंद्रासाठी साजरा करतात तर तिसऱ्या दिवशी ‘ मट्ट पोंगल ‘ हा गाईगुरांची […]

Happy Makar Sankranti

भोगीची भाजी

पौष मासातील विशेष महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती! मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. ही भारतात सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस! स्त्रिया ह्या दिवशी दिवाळीसारखेच अभ्यंगस्नान करुन साजशृंगार करतात. विविध भाज्या एकत्रित करुन (ह्या भाजीत तिळाचा वापर आवश्यक असतो) एक भाजी केली जाते. ही ‘भोगीची भाजी’, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी […]

स्वामी विवेकानंद

‘ज्ञान हा जीविताचा आदिहेतू आहे. दुसरा हेतू सुखप्राप्ती हा आहे. या दोहोंच्या सांगडीनें हा विश्र्वसमुद्र तरुन पैलतीरास तुम्ही जातां आणि तीच मुक्ती ! पण ही मुक्ती एकटयालाच मिळवितां येत नाही. जगातील कीडमुंगीसारखे प्राणी मुक्त होतील तेव्हाच तुम्हांस खरा मुक्तिलाभ होईल. सर्व सुखी होईपर्यंत आपण एकटे सुखी आहोंत असे म्हणण्याचा अधिकार कोणासही नाही. तुम्ही कोणाला दुःख […]

गुळाची पोळी

गुळाची पोळी कशी बनवाल – साहित्यः ५०० ग्रॅम गूळ किसलेला १ वाटी तीळ कूट खसखस कूट ५-६ वेलदोडे व भाजून चुरलेले १ टेबलस्पून खोबरे २|| टेबलस्पून डाळीचे पीठ २ वाट्या कणीक १ वाटी मैदा कृती: कणीक, मैदा व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून नेहमीप्रमाणे पोळयांसाठी पीठ भिजवून ठेवावे. चांगला पिवळा गूळ […]

अॅन्टिबायोटिक्स आणि सुपरबग्ज

आपल्याला आजार रोगजंतूंच्या संसर्गाने होतात. रोगजंतू दोन प्रकारचे असतात, जीवाणू व विषाणू. विषाणूमुळे होणाऱ्या रोगांवर प्रतिजैविकांची (Antibotics) गरज नसते, पण जिवाणूमुळे होणाऱ्या रोगांसाठी प्रतिजैविके जीव वाचविणारी ठरतात. पुरातन काळापासून माणसाचे शरीर वातावरणातील (म्हणजे हवा, पाणी, माती, वनस्पती इ.) जंतूंच्या हल्ल्याला तोंड देत आले आहे. प्रतिजैविकांचा शोध लागण्यापूर्वी या जंतूंच्या संसर्गाने होणारे इन्फेक्शन व त्यामुळे ओढावणारे […]

A cup of smile : स्वागत नववर्षाचे!

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण मुंबई तयारीत होती. पण त्यांच्या या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये, कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून मुंबई पोलीस मात्र मुंबईच्या रस्त्यांवर आपली ड्युटी बजावत होते. अशा वेळी त्यांच्या डोक्यावरील कामाचा हा ताण कसा कमी करता येईल, हा प्रश्न काही मुंबईकर तरुणांना पडला आणि त्यांना एक वेगळीच युक्ती सुचली – ‘A […]