September 12, 2024
मँगो | ice cream sandwich | mango recipe | dessert recipe | icecream sandwich | mango dessert | homemade ice cream sandwich | aam recipe | aam ka

मँगो सँडविच आइस्क्रीम | स्वाती पाटील, नाशिक | Mango Sandwich Ice Cream | Swati Patil, Nashik

मँगो सँडविच आइस्क्रीम

साहित्य: १ स्कूप मँगो आइस्क्रीम, मँगो पल्प (आंब्याचा रस), आंब्याचे काप, ३ ब्रेड स्लाइस, बटर, चीज, सजावटीसाठी टूटीफ्रुटी/रेनबो स्प्रिंकलर.

कृती: ब्रेडच्या तिन्ही स्लाइस साइडने कट करून बटर लावून घ्या. नंतर दोन ब्रेड स्लाइसवर मँगो पल्प पसरवा. एका ब्रेड स्लाइसवर आंब्याची एक काप/फोड ठेवा. दुसऱ्या ब्रेड स्लाइसवर आंब्याचे आइस्क्रीम ठेवा. या दोन्हीही स्लाइसवर एक एक चीज क्यूब किसून घाला. आंब्याची काप ठेवलेल्या ब्रेड स्लाइसवर आइस्क्रीमची स्लाइस ठेवा आणि त्यावर प्लेन बटर स्लाइस ठेवा. नंतर हलक्या हाताने या तिन्ही स्लाइस प्रेस करा. वरून पुन्हा थोडेसे बटर लावून घ्या आणि राहिलेला तिसरा चीज क्यूब किसून घाला.

सजावटीसाठी वरून टूटीफ्रुटी, रेनबो स्प्रिंकलर घालून हे मँगो सँडविच सर्व्ह करा. आपण सँडविच कट करतो त्याप्रमाणे कट करा.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


स्वाती पाटील, नाशिक

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.