आइस्क्रीम | best ice cream | ice cream bar | ice cream ice cream | ice cream day

केसर मलई आइस्क्रीम | नमिता गटणे, नाशिक | Kesar Malai Ice Cream | Namita Gatane, Nashik

केसर मलई आइस्क्रीम

साहित्य: १ कप शहाळ्याची मलई, १/२ कप भिजवलेले काजू, १/४ कप गूळ पावडर, ४ खजूर, १/३ कप नारळ पाणी, भिजवलेल्या केशरच्या १० काड्या, १ चिमूटभर वेलची पावडर, १ चिमूटभर सैंधव मीठ.

कृती :प्रथम एका मिञ्चसरच्या भांड्यात शहाळ्याची मलई , भिजवलेले काजू , गूळ पावडर , खजूर , नारळ पाणी , केसर , वेलची पावडर , मीठ हे सर्व साहित्य घालून मिञ्चसरला फिरवून घ्या. छान अशी मऊ पेस्ट तयार झाली, की कुल्फीच्या साच्यात भरा किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा. दोन तासानंतर आइस्क्रीम/कुल्फी तयार झाली असेल.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


नमिता गटणे, नाशिक

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.