डाएट | fad diet definition | types of fad diets | popular fad diets | weight loss foods

फॅड डाएट विरुद्ध संतुलित आहार | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | Fad Diet vs Balanced Diet | Prachi Rege, Dietitian

फॅड डाएट विरुद्ध संतुलित आहार

एका महिन्यात २० किलो वजन कमी करा’, ‘डाएट न करता ७ दिवसांत वजन कमी करा’, ‘हे प्या आणि एका दिवसात ५ किलो वजन कमी करा’ अशा प्रकारच्या जाहिराती आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. वजन कमी करणाऱ्यांना या जाहिरातींची भुरळ पडणे साहजिक आहे. पण अशा प्रकारची पोस्टर्स किंवा फ्लायर वाचून तुम्ही त्याचे अनुकरण करत असाल, तर तुम्ही ‘फॅड डाएट’चे बळी आहात. फॅड डाएट म्हणजे खरे तर मेद या घटकाची भर घालणारा सैतान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वजन झपाट्याने कमी करण्यासाठी लोकांना फॅड डाएट्सचे वेड लागते. पण अशा व्यक्ती काही किलो वजन कमी करण्यासाठी आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा अजिबात विचार न करता कोणत्याही थराला जाऊ शकतात.

फिटनेस आणि आरोग्य हे दोन वेगवेगळे पैलू आहेत. बांधेसूद शरीर आणि सिक्स पॅक असलेल्या व्यक्तीचे अवयवही तितकेच निरोगी असतील आणि ती व्यक्ती पूर्णपणे रोगमुक्त असेल, याची शाश्वती नाही. निरोगी शरीर असणारी व्यक्ती झोपेतून उठल्यावर कायम ताजीतवानी, उत्साही, चैतन्यमय असते. आळशी, थकलेली वा जडत्वाने भरलेली नसते. हे चांगल्या आरोग्याचे पहिले लक्षण आहे‧

सुदृढ आरोग्यासाठी नाव असलेले कोणत्याही प्रकारचे डाएट किंवा आहार क्षेत्रात नव्याने सादर करण्यात आलेल्या कोणत्याही डाएटचा अवलंब करू नका.  १०-२०-३० वर्षांनी या डाएटचे माणसाच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, हे आपल्याला आता माहीत नसते. नवे फॅड डाएट स्वीकारल्यावर तात्पुरत्या दिसणाऱ्या परिणामांनी हुरळून जाऊ नका.

फॅड डाएट आणि सकस संतुलित आहार या दोहोतील फरक:

फॅड डाएट

सकस संतुलित आहार

फॅड डाएट आहारातील एकूण कॅलरींवर भर देतो. याचाच अर्थ फॅड डाएटमध्ये फक्त मॅक्रो न्यूट्रिअंट्स (कर्बोदके, मेद व प्रथिने) यांचा विचार केला जातो. सकस संतुलित आहार कॅलरी पोषण प्रमाणावर लक्ष केंद्रित करते. मॅक्रो न्यूट्रिअंट्स (कर्बोदके, प्रथिने आणि मेद) आणि मायक्रो न्यूट्रिअंट्स (जीवनसत्वे, क्षार, अँटिऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल्स इ.)
कसेही करून वजन कमी करणे, एवढाच मुख्य उद्देश असतो. यात बरे होण्याला प्राधान्य नसते. जीवनशैलीतील बदल हे यामागील मुख्य ध्येय (अजेंडा) असते.वजन कमी होणे, हे ओघाओघाने होते. संतुलित आहाराचा फायदा आजार, पोषक घटकांची कमतरता आणि / किंवा विकारांवर होतो.
फॅड डाएटचा अवलंब केल्यानंतर वजन तात्पुरते कमी होते. पण डाएट थांबवल्यावर आणि / किंवा सामान्य आहार घेण्यास सुरुवात केल्यावर वजन दुप्पट वाढते. शरीरावर यो-यो (वजन वाढीचा) परिणाम होत नाही. आरोग्यदायी संतुलित आहार शरीरात सहज पचला जातो. तुम्ही कमी केलेले वजन बराच काळ टिकते.
यामध्ये काही कमतरता राहू शकते. झोपेच्या वेळांवर, आतड्यातील जिवाणूंच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. केस गळणे, त्वचा-विकार आदी समस्या सतावू
शकतात. ही यादी न संपणारी आहे.
सकस आहार याच्या एकदम उलट काम करतो आणि तुमच्या शरीरातील कमतरताभरून काढतो. आतड्यातील सूक्ष्म जंतू कार्यक्षम होतात, ज्यामुळे तुमची प्रतिकार-क्षमता वाढते. या आहाराचे कोणतेही दुष्परिणाम नसतात.
यात तुमच्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ उपलब्ध नसतात. तृणधान्ये, डाळी, फळे, भाज्या असा वैविध्यपूर्ण आहार म्हणजेच सकस आहार. या प्रत्येक घटक जिन्नसाचे स्वतःचे वेगळे असे गुणधर्म आहेत, त्याचा शरीराला फायदा होतो.
फॅड डाएटमध्ये कॅलरीवर प्रचंड मर्यादा येते. हा आहार स्वीकारताना व्यायाम करणे आवश्यक असेलच असे नाही. आरोग्यदायी संतुलित आहारात आरोग्यदायी आहार, व्यायाम, व्यवस्थित झोप आणि तणावाचे व्यवस्थापन या चार बाबींवर मुख्य भर असतो.
फॅड डाएट अलीकडच्या अभ्यासावर आधारलेला आहे. त्यात पटण्याजोगी वैज्ञानिक आकडेवारी असेलच असे नाही. संतुलित सकस आहार पडताळणी व चाचणी करून पाहिलेला असून सिद्ध वैज्ञानिक आकडेवारीवर आधारित
आहे. आपले पूर्वज अनेक वर्षांपासून हा आहार घेत आले आहेत आणि ते अत्यंत आनंदी व निरोगी आयुष्य जगले आहेत.
या नव्या खानपानाच्या सवयीमुळे कदाचित शरीर, मन, आत्मा समाधानी असणार नाहीत. शरीर, मन आणि आत्मा अनादी काळापासून हा आहार घेत आहेत.

तुमचा आहार विचारपूर्वक निवडा. आपल्याला पूर्वापार माहीत असलेला आहार घेण्यातच खरे शहाणपण आहे. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात अर्थ नाही.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


प्राची रेगे, आहारतज्ज्ञ

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.