हुरडा ओट्स कटलेट्स

Published by कांचन बापट, खाऊचा डबा : स्वादिष्ट जानेवारी २०१७ on   January 20, 2017 in   Tiffin Box

साहित्य :

  • १ वाटी कोवळा (शक्यतो गुळभेंडी) हुरडा
  • १/२ वाटी ओट्सफ्लेक्स
  • १ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा
  • २ टेबलस्पून हलके भाजलेले तीळ
  • १ टीस्पून आले-मिरची पेस्ट
  • मूठभर कोथिंबीर
  • १/४ वाटी ब्रेडक्रम्स(ब्रेडसचा चुरा)
  • १/४ वाटी लोणी किंवा ऑलिव्ह ऑईल
  • मीठ

कृती :

ओट्समध्ये अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित शिजवावा. बटाटा किसून घ्यावा. हुरडा मिक्सरवर अर्धवट बारीक करून घ्यावा. शिजलेले ओट्स, किसलेला बटाटा आणि बारीक केलेला हुरडा एकत्र करून घ्यावा. त्यात मीठ, आले-मिरची आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यावी. हलक्या हाताने त्याचा गोळा मळावा. नंतर आवडीच्या आकाराचे कटलेट्स वळावेत.

कटलेट वळण्याचा विशिष्ट साचा किंवा कुकीकटरच्या मदतीने आकर्षक आकाराची कटलेट्‌स बनवली तर मुलांना ते खूप आवडते. तयार कटलेट्‌स एका बाजूने ब्रेडक्रम्समध्ये घोळवून घ्यावेत तर दुसऱ्या बाजूला ब्रेडक्रम्स आणि तीळ घालून थोडे दाबून घ्यावे. लोणी किंवा ऑलिव्ह ऑईल सोडून पॅनमध्ये दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत परतावे. पुदिन्याच्या चटणीबरोबर डब्यात द्यावे.

*अधिक पारंपरिक आणि आधुनिक रेसिपीजसाठी आजच कालनिर्णयची स्वादिष्ट आवृत्ती खरेदी करा.

( सौजन्य : कांचन बापट, खाऊचा डबा : स्वादिष्ट जानेवारी २०१७ )