पनीर टिक्का मसाला (भाज्यांसहित) | Kalnirnay Blog

झटपट पनीर टिक्का मसाला (भाज्यांसहित)

साहित्य :

  • १/४ किलो पनीर
  • प्रत्येकी १ सिमला मिरची
  • टोमॅटो
  • कांदा
  • लिंबू
  • मीठ
  • १ टीस्पून गरम मसाला  किंवा तंदुरी मसाला
  • तेल
  • २ टेबलस्पून मेतकूट
  • १ टीस्पून मिरपूड
  • चाट मसाला

कृती :

  • पनीरचे चौकोनी तुकडे करावे. भाज्यांचे स्लाईस करावे. लिंबाचा रस काढावा.
  • त्यात गरम मसाला/तंदुरी मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे.
  • त्यात पनीरचे तुकडे घालून ढवळावे. कमीतकमी अर्धा तास झाकून ठेवावे.
  • हवे तर रात्रीच मॅरिनेट करून काचेच्या बाऊलमध्ये डब्यात घालून फ्रीजमध्ये झाकून ठेवावे.
  • पनीर टिक्का करताना तव्यावर तेल सोडून त्यावर पनीरचे तुकडे आणि भाज्यांचे स्लाईस परतायला टाकावे.
  • दोन-तीन मिनिटांनी त्यावर मेतकूट आणि मिरपूड भुरभुरावे. एका बाजूने भाजले गेले की ती बाजू उलटवावी.
  • वरून तेल सोडावे तसेच चाट मसाला, मेतकूट आणि मिरपूड भुरभुरावी.
  • दोन्ही बाजूंनी परतले की उतरवून टूथपिकला टोमॅटो स्लाईस, पनीर आणि सिमला मिरचीचे स्लाईस लावून डब्यात द्यावे.
  • बरोबरच हवा तर कांदा चिरून त्याला तिखट, मीठ लावून द्यावा. वरून चाट मसाला भुरभुरावा.

डब्यात पनीर टिक्का मसाला देण्याचा विचार आपण करत नाही, पण मुलांच्या आहारात सकाळच्या वेळेला पनीर असणे पोषणदृष्ट्या योग्य ठरते तसेच ही रेसिपी झटपट बनते. त्यामुळे एकदातरी ही रेसिपी डब्यासाठी मुलांना करून द्यायला हरकत नाही.

*अधिक पारंपरिक आणि आधुनिक रेसिपीजसाठी आजच कालनिर्णयची स्वादिष्ट आवृत्ती खरेदी करा.

( सौजन्य : कांचन बापट, खाऊचा डबा : स्वादिष्ट फेब्रुवारी २०१७ )

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.