थाय | vegan thai food । traditional thai food । famous thai food । authentic thai food । national dish of thailand

क्विनोआ राइस विथ थाय करी | अदिती कामत

क्विनोआ राइस विथ थाय करी

क्विनोआ राइस

भारतीय चायनीज शैलीतील क्विनोआ व्हेजी स्टार-फ्राइड डिश ही अत्यंत सोपी व आरोग्यदायी पाककृती आहे.

साहित्य: १ मोठा चमचा तिळाचे किंवा ऑलिव्ह ऑइल, ३ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या), २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, १/४ कप बारीक चिरलेला कांदा, १/४ कप किसलेले गाजर, १/४ कप गाजराचे बारीक तुकडे, १/४ कप फरसबी, १/४ कप ढोबळी मिरची (लाल व पिवळी), १/४ कप ब्रोकोली, २ छोटे चमचे सोया सॉस, १ छोटा चमचा व्हाइट व्हिनेगर किंवा अॅपल सायडर (आवडत असल्यास), ११/२ कप शिजवलेला क्विनोआ, चवीनुसार मीठ व काळीमिरी, सजावटीसाठी कांद्याची पात.

कृती:  क्विनोआ शिजवून घ्या व पूर्ण थंड होऊ द्या. कढईमध्ये तिळाचे किंवा ऑलिव्ह ऑइल मध्यम आचेवर गरम करा. त्यात चिरलेला लसूण, कांदा, हिरव्या मिरच्या घालून परतवा व मग इतर भाज्या घाला. आच मोठी ठेवून भाज्या शिजेपर्यंत आणि मऊ होईपर्यंत परतवा. त्यात सोया सॉस, व्हिनेगर घालून जास्त आचेवर परतवा. नंतर त्यात शिजवलेला क्विनोआ, मीठ, काळीमिरी पावडर घालून मिश्रण चांगले मिसळा. मंदाग्नीवर दोन-तीन मिनिटे शिजवा. कांद्याच्या पातीने सजवून सर्व्ह करा.

थाय करी

रेड करी हा थायलंडचा लोकप्रिय पदार्थ आहे.

साहित्य: १ मोठा चमचा तेल, ३ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या), १/२ इंच आले, १ छोटा पिवळा कांदा बारीक चिरलेला, २-३ मोठे चमचे थाय रेड करी पेस्ट, साधारण ४०० मिली नारळाच्या सायीचे दूध, पाव कप पाणी, १ छोटा चमचा ब्राउन शुगर (आवडीनुसार), १ मध्यम आकाराची झुकिनी बारीक चिरलेली, १ मध्यम आकाराची ढोबळी मिरची पातळ चिरलेली, १/२ कप बेबी कॉर्न, १/२ कप टोफू किंवा पनीर, काफिर लिंबाची पाने (किंवा अर्धे लिंबू व बेसिलचा अर्क), १ मोठा चमचा लिंबाचा रस, १/२ कप थाई बेसिल, चवीनुसार मीठ.

कृती: कढईत मंदाग्नीवर तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला लसूण, आले कांदा घालून दोन मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात थाई रेड करी पेस्ट घालून चांगले परतवून घ्या. नारळाच्या सायीचे दूध व पाव कप पाणी घाला. चार-पाच मिनिटे मंद आचेवर उकळी आणा. सोया सॉसमध्ये ब्राउन शुगर, झुकिनी, ढोबळी मिरची पातळ चिरलेली, बेबी कॉर्न, टोफू, काफिर लिंबाची पाने (किंवा लिंबाचा अर्क), मीठ घालून नीट ढवळून घ्या. कढईवर झाकण ठेवून मंदाग्नीवर चार-पाच मिनिटे शिजू द्या. करी पातळ करण्यासाठी त्यात पाणी घालू शकता. गॅस बंद करून त्यात लिंबाचा रस व चिरलेली बेसिलची पाने घालून ढवळून घ्या व भातासोबत सर्व्ह करा.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अदिती कामत

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.