काकडी पोहे

साहित्य:

  • २-३ वाट्या पातळ पोहे
  • २ छोट्या कोवळ्या काकड्या
  • १/४ वाटी बारीक चिरलेली कैरी
  • १/२ वाटी खवलेले खोबरे
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • तेल

फोडणीचे साहित्य:

  • २ टेबलस्पून पिठीसाखर
  • मीठ
  • १ छोटा बारीक चिरलेला कांदा

कृती:

  • पोहे हलके होईपर्यंत भाजून घ्यावे.
  • मिरच्यांचे छोटे तुकडे करून घ्यावे.
  • काकडी बारीक चिरून घ्यावी.
  • २-३ टेबलस्पून तेल गरम करावे.
  • त्यात मोहरी घालून तडतडू द्यावे.
  • लगेच हिंग, जिरे आणि मिरच्यांचे तुकडे घालून ढवळावे.
  • मिरच्या लालसर झाल्या की, गॅस  बंद करावा.
  • तयार फोडणी भाजलेल्या पोह्यांवर घालून मीठ, साखर घालून हलक्या हाताने व्यवस्थित ढवळावे.

टिप्स: 

  • पोहे खायच्या ऐन वेळेला त्यात कांदा, काकडी, कैरी, कोथिंबीर घालून हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून लगेच खायला द्यावे.
  • कैरी नसेल तर लिंबू वापरावे. कैरी फार आंबट नसावी.
  • फारशी तेलकट वा मसालेदार नसलेली ही रेसिपी मुलांना खूप आवडते तसेच पोटासाठी हेल्थी ठरते.

 – कांचन बापट | मे २०१७ | कालनिर्णय स्वादिष्ट २०१७ 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.