टॅकोज विथ सालसा | निलेश लिमये | Tacos With Salsa | Chef Nilesh Limaye

Published by निलेश लिमये on   April 1, 2022 in   Tacos Recipe

टॅकोज विथ सालसा

टॅकोज हा पदार्थ मक्याच्या पिठापासून तयार केला जातो, तर सालसा हा टोमॅटो, मिरचीपासून तयार केला जाणारा सॉस.

साहित्य: १ कप मक्याचे पीठ, कोमट पाणी (गरजेनुसार) व चवीनुसार मीठ.

स्टफिंगसाठी साहित्य: १ वाटी चवळी आणि राजमा (उकडलेला), २ कांदे, ३ टोमॅटो, ५-६ लसूण पाकळ्या, प्रत्येकी १ सिमला मिरची (लाल, पिवळी,हिरवी), १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, १ छोटा चमचा काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तेल‧

साहित्य: ४ टोमॅटो, ३ कांदे, १ काकडी, ३-४ हिरव्या मिरच्या, प्रत्येकी २ सिमला मिरची (लाल, पिवळी, हिरवी), १ कोथिंबीर जुडी‧

टॉपिंगसाठी साहित्य: किसलेले चीज, सोर क्रीम, आवश्यकतेनुसार पुदिना व कोथिंबीर‧

टॅकोजची कृती: सर्वप्रथम मक्याच्या पिठात चवीनुसार मीठ घालून कोमट पाण्यात पीठ मळून घ्या.तयार पिठाची भाकरी बनवा.

स्टफिंगसाठी कृती: गॅसवर वांगे भाजतो त्याप्रमाणे कांदे, लसूण पाकळ्या, टोमॅटो, सिमला मिरची (लाल, पिवळी, हिरवी) भाजून घ्या.भाजल्यानंतर वरचे आवरण काढून वेगवेगळे जाडसर ठेचून घ्या.

सारणासाठी कृती: पॅनमध्ये तेल गरम करून त्यात ठेचलेला कांदा, लसूण व सिमला मिरची घाला. नंतर यात ठेचलेली हिरवी मिरची, १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर व चिमूटभर काळीमिरी पावडर घालून परतून घ्यावे. नंतर त्यात शिजवलेली चवळी व राजमा कुस्करून (क्रश करून) घाला व मिश्रण चांगले परतवून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून वाफ काढा. चवीनुसार मीठ घालून वरून कोथिंबीर भुरभुरवा.

सालसासाठी कृती: कांदा, लसूण व सिमला मिरची एकत्र करून त्यात मीठ व मिरपूड घाला. त्यात काकडी बारीक ठेचून कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

स्टफिंगसाठी: तयार भाकरीवर सारण पसरवून घ्या. त्यावर सालसाचे टॉपिंग करा व वरून किसलेले चीज, सोर क्रीम घाला. पुदिन्याची पाने व कोथिंबिरीने सजवा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


निलेश लिमये