स्ट्यू | vegetable stew kerala style | vegan vegetable stew | vegetable stew indian style | vegetables for stew | traditional vegetable stew

केरळ व्हेजिटेबल स्ट्यू | गिरीजा नाईक | Kerala Vegetable Stew | Girija Naik

केरळ व्हेजिटेबल स्ट्यू

साहित्य: २ कप विविध भाज्या (गाजर, मटार, फरसबी, कोबी व बटाटे), १ चिरलेला कांदा, १ कप नारळाचे दूध, २ मोठे चमचे खोबऱ्याचे तेल, १ छोटा चमचा किसलेले आले, १ चिरलेली हिरवी मिरची, ४-५ लवंग, १ इंच दालचिनी, २ तमालपत्र, ८-१० मिरी, १ दगडफूल, २ मोठी वेलची, कढीपत्ता, १ कप पाणी, काळी मिरपूड व चवीनुसार मीठ.

कृती:  सर्वप्रथम कढईत खोबऱ्याचे तेल तापवून घ्या. त्यात मिरी, तमालपत्र, दगडफूल, दालचिनी, मोठी वेलची व लवंग घाला. त्यानंतर कढीपत्ता, चिरलेली हिरवी मिरची व किसलेले आले घालून झाकण ठेवा. थोड्या वेळानंतर बारीक चिरलेला कांदा लालसर होईस्तोवर परतवून घ्या. विविध भाज्या, पाणी व मीठ घाला. भाज्या चांगल्या शिजल्यानंतर नारळाचे दूध घाला. मिश्रण ढवळून घ्या. काळी मिरपूड घाला. मंदाग्नीवर उकळू द्या. स्ट्यू घट्ट झाल्यानंतर इडिअप्पम, डोसा, अप्पम किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.

टीप: भाज्या अति शिजवू नये, त्याचा पोत कायम टिकवावा. त्याने चव टिकून राहाते.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


गिरीजा नाईक

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.