खरवस | Maize semolina recipe | corn flour recipe | kharvas | cake | kharvas recipe | junnu recipe | kharvas online

मक्याच्या रव्याची खरवस वडी | वैशाली मोरे, नवी मुंबई | Maize Semolina Kharvas Cake | Vaishali More, Navi Mumbai

मक्याच्या रव्याची खरवस वडी

साहित्य : १ वाटी मका रवा, ३/४ वाटी साखर, ४ वाट्या नारळाचे दूध, १/२ छोटा चमचा वेलची पूड, १/४ वाटी काजू-बदाम पूड, आवश्यकतेनुसार तूप.

सजावटीसाठी : ड्रायफ्रूट्स व पेरूचे पान.

कृती : सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात रवा, दूध व साखर घेऊन हे मिश्रण पाच मिनिटे उकळत ठेवा. मंद आचेवर हे मिश्रण ढवळत राहा. उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनिटांनी हे मिश्रण घट्ट होईल. नंतर त्यात वेलची पूड, काजू-बदाम पूड घालून एकत्र करा. आता गॅस बंद करा व एका थाळीला तूप लावून घ्या. घट्ट झालेले मिश्रण थाळीवर थापून त्यावर काजू, बदाम, मनुके, भोपळ्याच्या बिया घाला. थंड झाल्यावर वड्या पाडून पेरूच्या पानावर सर्व्ह करा. मक्याच्या रव्याची खरवस वडी तयार.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वैशाली मोरे, नवी मुंबई

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.