पिनव्हील सँडविच

साहित्य


  1. स्लाईस ब्रेड
  2. २ टेबलस्पून चटणी (सँडविचला करतो ती)
  3. उकडलेला बटाटा
  4. १ टेबलस्पून बटर

Tiffin Box recipe :Tangy Veggie wrap

कृती


  • ब्रेडचे तीन स्लाईसेस घेऊन त्याच्या कडा काढून टाकाव्यात.
  • तीनही स्लाईस पाण्याचा वापर करून एकमेकांना जोडावेत.
  • त्यावर चटणी,उकडलेला बटाटा(बारीक करून), बटर ब्रेडच्या तीनही स्लाईसवर लावावे.
  • एका बाजूने स्लाईस हळूच दुमडून घ्यावेत.
  • ते सर्व ओल्या नॅपकिन मध्ये गुंडाळून २ तास फ्रीजमध्ये ठेवावेत.
  • खायच्या आधी फ्रीजमधून बाहेर काढून अर्धा इंचाचे काप करावेत.
  • तीन काप केल्यावर आपल्याला ५-६ सँडविच मिळतात.

 – स्नेहलता लालपुरिया | कालनिर्णय जून १९९५

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.