फ्रुटी पिझ्झा बाईट्स

Published by Kalnirnay Swadishta July 2016 on   May 6, 2017 in   Dessert SpecialFood Corner

साहित्य :


  • ४ – ५ व्हॅनिला स्लाईस केक
  • ४-५ टेबलस्पून फ्रेश क्रीम
  • २ टेबलस्पून प्रत्येकी बारीक चिरलेला अननस, सफरचंद, किवी, डाळिंबाचे दाणे व आपल्याला हवी असलेली इतर कोणतीही फळे घ्यावी.

कृती :


  • एका स्लाईस केकचे सारखे चार चौकोनी तुकडे कापावेत. क्रीम हलक्या हाताने फोर्कने घट्ट होईपर्यंत फेटून घ्यावे.
  • कापलेल्या चौकोनांवर थोडे थोडे क्रीम लावावे आणि त्यावर कापलेले फळांचे तुकडे आपल्या आपल्या आवडीनुसार रचावे.
  • फ्रीजमध्ये ठेवून सर्व्ह करावेत.

– कालनिर्णय स्वादिष्ट जुलै २०१६