बनाना ओट्स पॅनकेक | गिरीजा नाईक | Banana Oats Pancake | Girija Naik

Published by गिरीजा नाईक on   September 1, 2022 in   Dessert Special

बनाना ओट्स पॅनकेक

साहित्य: १ कप ओट्स, १ मोठे केळे, ११/४ कप दूध, १ अंडे, १ मोठा चमचा मध, १/२ मोठा चमचा व्हॅनिला इसेन्स, १/४ छोटा चमचा मीठ, १/४ छोटा चमचा दालचिनी पावडर, १ छोटा चमचा बेकिंग पावडर व खोबऱ्याचे तेल

कृती: काचेच्या बाऊलमध्ये ओट्स, केळे, दूध, अंडे, मध, व्हॅनिला इसेन्स, मीठ, दालचिनी पावडर, बेकिंग पावडर घालून चांगले ब्लेंड करा (ओट्सची पावडर होईपर्यंत ब्लेंड करायला हवे). त्यानंतर मंदाग्नीवर पॅन गरम करून एक चमचा खोबरेल तेल त्यावर पसरवा. पाव कप तयार मिश्रण तव्यावर पसरवून दोन ते तीन मिनिटे शिजू द्या. सुका मेवा, फळे किंवा मेपल सिरपसोबत बनाना ओट्स पॅनकेक सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


गिरीजा नाईक