पोहे

दही पोहे – कालनिर्णय

दही पोहे बनविण्यासाठी 


साहित्य:

 • २ वाट्या पातळ पोहे
 • २ वाट्या गोड दही
 • फोडणीसाठी तूप
 • जिरे
 • ४ हिरव्या मिरच्या
 • १० लसूण पाकळ्या
 • कोथिंबीर
 • चवीप्रमाणे मीठ
 • साखर
 • दूध
 • फरसाण

कृती:

 1. प्रथम पोहे धुवून घेणे.
 2. त्यात दही, मीठ, साखर घालणे.
 3. पळीमध्ये तूप घालून त्यात जिरे, मिरच्या, लसूण पाकळ्या घालणे व ही फोडणी पोह्यांना देणे.
 4. सर्व मिश्रण नंतर कालवणे.
 5. घट्ट वाटल्यास थोडे दूध घालून पोहे सरसरीत करणे.
 6. खाण्यास देताना वरती थोडे फरसाण घालून कोथिंबीर घालून देणे.

*Note: फोडणीत खांडणी मिरची घातल्यास जास्त खमंग लागते.


Click here for more recipes

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.