जवस | flaxseed protein | flax seeds reduce weight | flax seeds for weight loss | flaxseed for constipation

जवसाचे पौष्टिक लाडू | अनघा मुळे, नागपूर | Linseed Nutritious Ladoo | Anagha Mule, Nagpur

जवस पौष्टिक लाडू

साहित्य: २ वाट्या जवस, १ वाटी तीळ, १ वाटी खोबऱ्याचा कीस, १/२ वाटी खसखस, १/२ वाटी काजू, १/२ वाटी बदाम बी, १/२ वाटी खारीक, १/२ वाटी अक्रोड, १/२ वाटी पिस्ता, १/२ वाटी मखाणे, १ वाटी साजूक तूप, ११/२ वाटी गूळ, आवश्यकतेनुसार वेलची पावडर आणि चोको चिप्स.

कृती: जवस, तीळ, खसखस, खोबऱ्याचा कीस वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्या. साजूक तुपावर काजू, बदाम बी, खारीक, अक्रोड, पिस्ता, मखाणे भाजून एक-एक करून थोडे जाडसर मिक्सरमध्ये वाटून घ्या. वरील सर्व साहित्य, किसलेला गूळ एकत्र करून त्यात वेलची पावडर व चोको चिप्स घालून लाडू वळा.

टीप: ड्रायफ्रूट्स तुपात भाजल्यास लाडू वळण्यास त्रास होत नाही.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अनघा मुळे, नागपूर

One comment

  1. Good..

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.